लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने ‘कॉल वेटिंग’ हे नवं फीचर आणलं आहे. या नव्या फीचरमुळे व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची एक मोठी समस्या दूर झाली आहे. हे फीचर व्हिडिओ कॉलिंगसाठीही वापरता येईल. मात्र, अद्याप ‘कॉल होल्ड’वर ठेवण्याचं फीचर व्हॉट्सअॅपवर आलेलं नाही.

आणखी वाचा- आता नाही विसरणार कोणतंच काम, Whatsapp देईल आठवण

व्हॉट्सअ‍ॅपने व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (VoIP) ही सेवा सुरू केली असून यामुळे अँड्रॉइड वापरकर्ते आता सामान्य मोबाइल कॉलप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपवरही वेटिंग कॉल पाहू शकणार आहेत. प्ले स्टोरवर आता व्हॉट्सअ‍ॅप अपडेट केलं तर हे नवं फीचर युजर्सला वापरता येणार आहे. कॉल वेटिंग हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या v2.19.352 किंवा यावरील व्हर्जनवर उपलब्ध आहे. व्हॉइस कॉलिंगसह व्हिडिओ कॉलिंगसाठीही या फीचरचा वापर करता येणार आहे. याआधी व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर जर तुम्ही इतरांसोबत बोलत असाल तर दुसरा कोणाचा कॉल येतोय हे कळत नव्हतं. पण, आता दुसरा कॉल वेटींगवर असल्याचं दिसेल.