झूम अॅपची वाढती लोकप्रियता पाहून व्हॉट्सअॅपनंही आपल्या व्हिडिओ कॉलिंग फिचर अपडेट केलं आहे. आता लवकर व्हॉट्सअॅपवर चारपेक्षा जास्त जणांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलता येणार आहे. व्हिडिओ कॉलिंग अॅपमधील वाढती स्पर्धा पाहून Google Duo नेही आपल्या फिचरमध्ये अपडेटची घोषणा केली आहे.

व्हॉट्स अॅप प्रमाणे Google Duoनं व्हिडिओ कॉलसाठी सदस्यांच्या संख्येत वाढ करणार आहे. Google Duo नं किती सदस्य करणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. पण, तंत्रज्ञाम क्षेत्रातील दिग्गजांच्या मते, सध्या Google Duo १२ जणांना व्हिडिओ कॉलसाठी सपोर्ट करते. त्यामुळे याबाबतीत ते व्हॉट्सअॅपच्या पुढेच राहणार आहे. Google Duo सध्या ग्रुप व्हिडिओ कॉलिंग फिचरवर काम करत आहे. भविष्यात गुगल व्हिडिओ फिचर अपडेट करणार आहे.

करोना व्हायरसमुळे देशात लॉकडाउन सुरू असून यादरम्यान व्हिडिओ कॉलिंगचं प्रमाण वाढलं आहे. लॉकडाउनमध्ये Google Duo मध्ये प्रत्येक आठवड्याला १० मिलियन युजर्स वाढत आहेत. त्यामुळे Google Duo नं आपलं व्हिडिओ कॉलिंग फिचर अपडेट करत आहे. इतर व्हिडिओ कॉलिंग अॅप प्रमाणेच Google Duo च्या युझर्सचं प्रमाण वाढल आहे. त्यामुळेच युझर्सला आकर्षीत करण्यासाठी Google Duo आपलं फिचर अपडेट करत आहे.