Five Tips For Men’s Health In Marathi : कामाची डेडलाइन, कौटुंबिक जबाबदाऱ्या जेव्हा एकत्र येऊन डोळ्यांसमोर उभ्या राहतात तेव्हा स्वतःकडे पाहिजे तसं लक्ष देता येत नाही. मग याचा विपरीत परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. सतत येणारा थकवा, झोपेचा त्रास, अनपेक्षित वजन वाढणे यांमुळे डोक्यात अनेक विचार येऊ लागतात. पण, यावर उपाय म्हणून काही लहान, जाणीवपूर्वक बदल करून, तुम्ही तुमची अशी एक जीवनशैली तयार करू शकता; जी केवळ तुमच्या शरीराला पोषणच नाही, तर मनालासुद्धा आधार देऊन जाईल.

तर पुढील ५ सवयी तुम्हाला मदत करू शकतात…

१. स्ट्रेच इट आऊट – योगा आणि श्वासोच्छ्वास

योगा आणि श्वासोच्छ्वासापासून अनेक पुरुष दूर राहण्याचा प्रयत्न करतात. पण, वयानुसार मजबूत, वेगवान व वेदनामुक्त राहण्यासाठी योग हा सर्वांत बेस्ट पर्याय आहे. ३० आणि ४० वयात स्नायू ताणणे, सांधे कडक होणे आणिव शरीराचे पोश्चर बिघडणे आदी समस्या जाणवू लागतात. पण, या समस्येवर दररोज १५ मिनिटे योगादेखील अगदी जबरदस्त काम करू शकते. त्यामुळे लवचिकता सुधारते, शरीराचे पोश्चर मजबूत होते आणि तुमचे सांधेसुद्धा निरोगी राहतात. श्वासोच्छ्वास तुमच्या मज्जासंस्थेचे नियमन करण्यास मदत करतो, रक्तदाब कमी करतो, चिंता कमी करतो आणि तुमची झोपदेखील सुधारते. त्यामुळे योगाचा फक्त हालचाल म्हणून विचार करा.

२. काहीतरी उचला

वय वाढत असताना फिट राहणे कठीण आहे. वय वाढत असताना स्नायू हळूहळू आकुंचन पावतात. तसेच सार्कोपेनिया नावाची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे; जी तुमच्या तिशीनंतर सुरू होते. पण, यावर प्रतिरोधक व्यायाम करणे हा एक उपायसुद्धा आहे. जेव्हा आपण स्नायूंवर भार देतो आणि त्या भाराचा सामना करीत व्यायाम करतो; तेव्हा त्याला प्रतिरोधक व्यायाम, असे म्हणतात. प्रतिरोधक व्यायाममध्ये – वजन उचलणे असो, प्रतिरोधक बँड वापरणे किंवा क्लासिक पुश-अप, स्क्वॅट्स करणे असो, स्ट्रेंथ ट्रेनिंग स्नायूंचा आकार व ताकद टिकवून ठेवण्यास, चयापचय वाढविण्यास आणि टेस्टोस्टेरॉन यांसारख्या हार्मोन्सचे नियमन करण्यास मदत होते. त्यामुळे दीर्घकालीन आजार, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा व अगदी नैराश्याचा धोकादेखील कमी होतो.

३. तुमच्या मेंदूला प्रशिक्षित करा

एखादे कोडे सोडवा, नवीन पुस्तक वाचा, नवीन भाषा शिका, एखादे वाद्य वाजवा, ध्यान, जर्नलिंग यांमुळे मेंदूला लक्ष केंद्रित करण्यास मदत करील. त्यामुळे तुम्हाला येणारा तणाव दूर होईल, भावनिक लवचिकता वाढविण्यास आणि दीर्घकालीन मानसिक आरोग्यास समर्थन देण्यास मदत होईल.

४. रोगप्रतिकार वाढवण्यासाठी भरपूर खा

तुम्ही वयाच्या २० व्या वर्षी इन्स्टंट नूडल्स आणि एनर्जी ड्रिंक्सवर दिवसभर राहू शकता. पण, तुमचे शरीर प्रत्येक वयोगटात तेच पदार्थ खाऊ शकेल, असं नाही. वयाच्या ३० आणि ४० वर्षांत अन्न इंधन आणि औषध म्हणून काम करते. त्यामुळे ताज्या भाज्या, फळे, काजू, बिया, मांस खा.

रोगप्रतिकार शक्ती आणि पुनरुत्पादनासाठी झिंक आणि सेलेनियम यांसारख्या पोषक घटकांना आणि तुमच्या मेंदू, हृदयासाठी ओमेगा-३ (फॅटी मासे किंवा जवस बियाण्यांपासून बनविलेले पदार्थ) खाण्याला प्राधान्य द्या. तुम्हाला थकवा येईल असे पदार्थ म्हणजे- जास्त साखर, तळलेले अन्न, प्रक्रिया केलेले मांस व अल्कोहोल यांचे सेवन करू नका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. तुमच्या मनाला शांत ठेवा

ताण नेहमीच चिडचिडपणामुळेच येतो, असे नाही. कधी कधी खांद्यांमधून, झोप न येणाऱ्या रात्री किंवा कुजबुजणे आदी वेगवेगळ्या पद्धतींनी ताण बाहेर येऊ शकतो. ३० आणि ४० वयोगटातील पुरुषांवर अनेकदा आर्थिक ताण, करिअरमधील बदल, वृद्ध पालक, असा अदृश्य भार असतो. त्यासाठी तुम्ही प्रार्थना असो, जर्नलिंग, निसर्गात शांत चालणे असो, पाच मिनिटे दीर्घ श्वास घेणे असो किंवा फक्त विचार करत स्थिर बसणे असो आदी अनेक गोष्टी मन शांत ठेवण्यासाठी करा; त्यामुळे वजन कमी होते, कॉर्टिसोल कमी होतो, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि तुम्हाला भावनिकदृष्ट्या स्थिर राहण्यास मदत होते.