वृत्तसंस्था, लंडन : सध्याच्या धकाधकीच्या काळात अनेकांना बेकरीचे पदार्थ खाण्याची सवय जडली आहे. उन्हाळय़ात तर आइस्क्रीमही बहुतेकांनाच प्रिय असते. मात्र आइस्क्रीम आणि बेकरीचे पदार्थ हे शरीरासाठी धोकादायक असून त्यामुळे आतडय़ाचे आजार होऊ शकतात, असे संशोधन नॉर्वेच्या संशोधकांनी केले आहे.

नॉर्वेजिन युनिव्हर्सिटी ऑफ लाइफ सायन्सच्या संशोधकांनी केलेले हे संशोधन ‘नेचर मायक्रोबायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. बेकरीचे पदार्थ, आइस्क्रीम यांसारख्या पदार्थामध्ये जिनेथन गम असतो. विशेषत: मैद्याच्या पदार्थामध्ये हा घटक असतो. हा घटक मानवी शरीराला घातक असल्याचे या संशोधकांनी सांगितले. हा घटक आतडय़ांना चिकटून राहतो. त्यामुळे आतडय़ाचे आजार होण्याची शक्यता असते, असे या संशोधकांच्या गटाचे नेतृत्व करणाऱ्या सबिना ला रोजा यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संशोधकांनी जगभरातील विविध भागांत राहणाऱ्या नागरिकांचा आहार आणि त्यांच्या आहार पद्धतीचा अभ्यास केला. बेकरीचे पदार्थ सातत्याने खाणाऱ्यांना जिनेथन गममुळे आतडय़ाचे आजार झाल्याचे या अभ्यासात दिसून आले, असे सबिना ला रोजा यांनी सांगितले.