Ice for Face benefits: चेहरा चमकदार व मऊ करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. सोशल मीडियावरही बाजारातील फेसपॅकपासून ते घरगुती फेसपॅकचे फायदे सांगणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच चेहऱ्याला बर्फाने मसाज करण्याचे फायदे सांगणारे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. बरेच लोक असा दावा करीत आहेत की, बर्फ लावल्याने चेहऱ्यावरील सूज कमी होते आणि त्याच्या वापरामुळे मुरमेदेखील बरी होतात.
अनेक वर्षांपासून सूज कमी करण्यासाठी बर्फाचा वापर केला जात आहे. परंतु, चेहऱ्यावर बर्फ लावण्याच्या फायद्यांबाबतचे संशोधन अद्याप मर्यादित आहे. हेल्थलाइनच्या मते, चेहऱ्यावर बर्फ वापरण्याने अनेक फायदे आहेत. त्याच्या वापरामुळे चेहऱ्यावरील सूज कमी होते आणि चेहरा चमकदार राहतो.
चेहऱ्यावर बर्फ कसा वापरायचा?
चेहऱ्यावर बर्फाचा थेट वापर करू नये. जर तुम्ही फेशियल आयसिंग करीत असाल, तर प्रथम बर्फ स्वच्छ कापडात गुंडाळून, त्यानंतर तुम्ही त्याचा वापरू शकता. बर्फाने चेहऱ्याला एका वेळी एक ते दोन मिनिटे हलक्या आणि गोलाकार पद्धतीने मालिश करा. मालिश करताना हनुवटी, गाल, कपाळ आणि जबड्याच्या रेषेकडे लक्ष द्या. मालिश करताना बर्फ जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवू नका.
चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे फायदे
बर्फ लावल्याने चेहऱ्यावरील सूज आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे बरी होतात. तसेच या उपायामुळे
हे चेहऱ्यावरील छीद्र बंद करण्यास, तसेच अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत मिळते.
बेहयावर बर्फ लावल्यानेही मुरमांपासून आराम मिळतो.
ही क्रिया त्वचेला थंडावा देते आणि सनबर्नपासून आराम देते.
चेहऱ्यावर बर्फ लावण्याने काय नुकसान होऊ शकते?
चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे अनेक फायदे असले तरी त्यामुळे चेहऱ्याचे नुकसानदेखील होऊ शकते.