Why plastic is harmful for environment: प्लास्टिकच्या भांड्यांचे रंग, डिझाइन नेहमीच आपल्याला आकर्षित करतात, त्यामुळे आपल्यापैकी बरेच जण बाजारातून विविध प्रकारची प्लास्टिकची भांडी खरेदी करतात आणि दैनंदिन जीवनात वापरण्यास सुरुवात करतात. शिवाय स्टीलच्या तुलनेत प्लास्टिकची भांडी खूप स्वस्त असतात, त्यामुळे सामान्यांच्या खिशाला ते सहज परवडते.विशेषतः बर्याच लोकांना प्लास्टिकपासून बनवलेल्या प्लेट्स वापरण्यास आवडतात. पण, तुम्हाला माहिती आहे का? प्लास्टिकची प्लेट जितकी सुंदर दिसते तितकीच ती तुमच्या आरोग्यासाठीही घातक ठरू शकते.
अनेक संशोधनातून हे सिद्ध करण्यात आले आहे की, प्लास्टिकच्या प्लेट्समध्ये खाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. जेव्हा तुम्ही या प्लेट्समध्ये गरम अन्न किंवा इतर गरम गोष्टी ठेवता, तेव्हा प्लास्टिकच्या प्लेटमध्ये असलेली रसायने तुमच्या अन्नात मिसळू शकतात. हे अन्नपदार्थ खाणे तुमच्यासाठी विषारी ठरू शकते.
मायक्रोवेव्ह विषारीपणा निर्माण करू शकते
आपल्यापैकी बरेच जण अन्न मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्यासाठी प्लास्टिकच्या प्लेटवर ठेवून ते थेट मायक्रोवेव्हमध्ये ठेवतात, हे खूप धोकादायक ठरू शकते. जेव्हा तुम्ही प्लास्टिकच्या प्लेटमध्ये अन्न ठेवता आणि ते थेट मायक्रोवेव्हमध्ये ठेवता, तेव्हा त्याचे बरेच सूक्ष्म कण आणि प्लास्टिकचे लहान प्रमाण तुमच्या अन्नात जाऊ शकते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही हे अन्न खाता, तेव्हा ही रसायने तुमच्या शरीरात पोहोचू शकतात.
प्लास्टिकच्या प्लेट्समध्ये असलेली कोणती रसायने आरोग्यासाठी घातक आहेत?
बीपीएचा वापर व्हर्जिन प्लास्टिक बनवण्यासाठी केला जातो. बीपीए प्रामुख्याने पॉली कार्बोनेट किंवा पीली नावाच्या प्लास्टिकच्या प्रकारात आढळते. ते मोठ्या प्रमाणात शरीरासाठी विषारी असू शकते, त्यामुळे कर्करोग आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.
बीपीए हे एक रसायन आहे, जे तुमच्या शरीरात प्रवेश करून ट्रोजेनसारख्या हार्मोन्सचे असंतुलन करू शकते; यामुळे अनेक आजार होऊ शकतात. शरीरातील एस्ट्रोजेन हार्मोनचे असंतुलन झाल्याने अनेक आजार उद्भवू शकतात. हार्मोन असंतुलनामुळे मूड स्विंग, संवेदनशीलता, तेलकट त्वचा, निद्रानाश, ताण, चिडचिड, चिंता, कर्करोग आणि हृदयरोग होऊ शकतात. यामुळे महिलांना विशेषतः वंध्यत्वाचा त्रास होऊ शकतो.