Cough Remedies : सध्या हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि घसादुखीचा त्रास खूप जाणवतो. विशेषत:लहान मुलांना या ऋतूमध्ये खूप लवकर खोकला होतो. खोकला असा त्रास आहे की अनेकदा खूप प्रयत्न करुनही लवकर बरा होत नाही. अनेक औषधी घेऊनही काहीही फायदा होत नाही. जर तुम्हालाही वारंवार खोकला होत असेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
भारतात असे अनेक घरगुती उपाय केले जातात ज्यामुळे आराम मिळतो. सोशल मीडियावर खोकल्यापासून आराम मिळावा, म्हणून अनेक उपाय सांगितले जातात. इन्स्टाग्रामवर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये खोकला जाण्यासाठी एक घरगुती उपाय सांगितला आहे. योग शिक्षिका प्रणाली कदम यांनी हा घरगुती उपाय सांगितला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही घरच्या घरी खोकला पळवू शकता.
प्रणाली कदम इन्स्टग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत सांगतात –
१. सुरुवातीला एक छोटा चमचा काळे मीठ आणि काळी मिरी घ्या.
२. त्यात ४ चमचा ओवा आणि खिसलेले आले घ्या.
३. त्यानंतर त्यात ४-५ इलायची आणि ५ चमचा गुळ घ्या
४. नंतर हे मिश्रण गॅसवर गरम करा.
५. हे मिश्रण अर्धा चमचा गुळ घालून गरम करा.
६. सकाळी आणि रात्री हे मिश्रण घ्या.
वरील घरगुती उपाय केल्याने तुम्हाला खोकल्यापासून खूप लवकर आराम मिळू शकतो. हिवाळ्यात खोकला सर्दी होण्याचे प्रमाण वाढते अशात हा उपाय केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.
हेही वाचा : तुमचा जोडीदार तुमच्याविषयी सीरीअस आहे का? कसं ओळखाल? जाणून घ्या
yogpranali या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन योग शिक्षिका प्रणाली कदम यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खोकला जाण्यासाठी घरगुती उपाय”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती दिली.” तर एका युजरने लिहिलेय, “लहान मुलांसाठी हा उपाय करू शकतो का?” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप महत्त्वाची माहिती दिली”