Samsung च्या ‘रोटेटिंग कॅमेरा’ असलेल्या फोनचा ‘सेल’, मिळेल तब्बल 20 हजार रुपये डिस्काउंट

चार दिवसांच्या सेलमध्ये 20 हजार रुपये डिस्काउंटची भन्नाट ऑफर

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 23 ते 27 जून दरम्यान Big Savings Days सेलला सुरूवात होत आहे. सेलमध्ये अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोनवर दमदार डिस्काउंट दिले जात आहे. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी हा सेल आजपासून 22 जून रात्री आठ वाजेपासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये सॅमसंगच्या Galaxy A80 या स्मार्टफोनवर तब्बल 20 हजार रुपये डिस्काउंट दिले जात आहे.

41,999 रुपये इतकी बेसिक किंमत असलेला Galaxy A80 हा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या सेलमध्ये २० हजार रुपयांच्या सवलतीसह 21 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. या फोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यातील रोटेटिंग कॅमेरा. रोटेटिंग असल्याने याचा कॅमेरा प्रायमरीसह सेल्फी कॅमेऱ्याचंही काम करतो. सॅमसंगने हा फोन रोटेटिंग स्लाईडर पॅनलवर बनवला आहे. फोनच्या बॅक पॅनलवरील रिअर कॅमेरा सेटअपवर तीन कॅमेरा सेंसर आहेत. सेल्फीची कमांड देताच हाच स्लाईडर पॅनलवर येतो. पॅनलवर आल्यानंतर संपूर्ण रिअर कॅमेरा सेटअप फ्लिप म्हणजे रोटेट होतो, तसेच सर्व कॅमेरा सेंसर आणि फ्लॅश लाईट समोरच्या बाजूला येतात आणि अशाप्रकारे फोनचा रिअर कॅमेरा सेल्फी कॅमेरा बनतो.

फोनच्या रोटेटिंग स्लाईडर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये फ्लॅश लाईटसह एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सोबत फोनमध्ये 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस आहे. Galaxy A80 चा तिसरा कॅमेरा सेंसर 3डी डेफ्थ सेंसिंग टेक्नॉलॉजीसह येतो, हा सेंसर एफ/2.2 अपर्चरसह 8-मेगापिक्सलच्या पावरला सपोर्ट करतो. यात फुल एचडी प्लस सुपर अॅमोलेड डिस्प्ले आहे. या फोनमध्ये डॉल्बी अॅटम ऑडिओही देण्यात आला आहे. फोनमध्ये 3700 क्षमतेची बॅटरीही आहे. हा फोन तीन रंगात अँजल गोल्ड, फँटम ब्लॅक आणि घोस्ट व्हाइटमध्ये उपलब्ध आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Flipkart big saving days sale samsung galaxy a80 will be available for a starting price of rs 21999 instead of rs 41999 sas