रश्मीका मंदाना हिचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला, तंत्रज्ञानाचा दुरुपयोग धोकादायक आहे आणि तो रोखण्यासाठी कायद्याच्या चौकटीत काही ठोक पावले उचलायला हवीत अशी भूमिका त्यावर अमिताभ बच्चन यांनीही भूमिका घेतली आणि एकूण अचानक डीपफेक हा शब्द चर्चेत आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डीपफेकचा धोका कुणालाही असू शकतो. या गोष्टी फक्त सेलिब्रिटीसोबतच होतात आणि सर्वसामान्य माणसांचा याच्याशी संबंध नाही असं मानण्याचं काहीच कारण नाहीये. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या सेलिब्रिटी या के ड्रामामध्येही डीपफेक टेक्नॉलॉजीचा वापर आणि गैरवापर दाखवलेला आहे. जगभर या तंत्रज्ञानाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे डीपफेक म्हणजे काय, त्याचा सर्वसामान्य इंटरनेट वापरणाऱ्या माणसांना काय धोका असू शकतो, हे तंत्रज्ञान वापरले गेले आहे हे ओळखाल कसं हे समजून घेऊया.

हेही वाचा : Papaya: पपईचा आहारात समावेश केल्यानं झपाट्याने वजन कमी अन् कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं? तज्ज्ञांनी दिलं उत्तर…

डीपफेक म्हणजे काय?

सलमान खानला शाहरुख खानबद्दल अद्वातद्वा बोलताना तुम्ही व्हिडिओत बघितलं किंवा कुणी एक राजकारणी काहीतरी जातीयवादी बोलतोय, अचानक असा धक्कादायक व्हिडीओ तुमच्या व्हाट्सअॅपवर आला. अथवा, आलीया भट तुम्हाला कुठल्याशा सेलिब्रिटी पार्टीतलं गॉसिप सांगतेय असा व्हिडीओ मिळाला तर समजा तुम्ही डीपफेक बघताय.

डीपफेक म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर खरा वाटेल असा खोटा व्हिडीओ. एआय तंत्रज्ञानाचा वापर यात केला जातो, एखाद्या व्यक्ती, घटना, प्रसंग यांचा बारकाईने अभ्यास करुन मग त्यात बेमालूम बदल करण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे. म्हणजे आपण एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला एखादं खळबळजनक विधान करताना आपण पाहात असतो. व्यक्तीचा चेहरा, हावभाव सगळं खरं वाटावं असं असतं, आजूबाजूचं वातावरण खरं भासेल असं असतं. त्यामुळे बघताना व्हिडीओ खोटा आहे असं क्षणभरही वाटणार नाही. पण व्हिडीओ पूर्णपणे खोटा असतो. म्हणजे त्या व्यक्तीने तसे कुठलेही खळबळजनक विधान केलेलं नसतं. किंवा ती व्यक्ती त्या प्रसंगी तिथे नसतेच. कुणाच्याही तोंडी, कुठलेही शब्द टाकण्याचं, कुणालाही कुठल्याही प्रसंगात, घटनेत नेऊन बसवण्याचं कौशल्य या तंत्रज्ञानात आहे आणि म्हणूनच ते आजच्या काळातलं सगळ्यात धोकादायक तंत्रज्ञान मानलं जातंय.

हेही वाचा : Benefits of 100 Gram Ajwain: डायबिटीस असल्यास ओवा खाणे योग्य आहे का? वजन कमी करण्यासाठी ओवा ठरतो जादुई?

डीपफेकचा वापर प्रामुख्याने पॉर्न कॉण्टेन्ट तयार करण्यासाठी सुरु झाला. पण आता या राक्षसाने हातपाय पसरवून आक्राळविक्राळ रूप घ्यायला सुरुवात केली आहे. एखाद्या युद्धात जे घडलंच नाही ते दाखवणं, एखाद्या सेलिब्रिटीची फेक व्हिडीओ क्लिप तयार करुन व्हायरल करणं इथपासून काय वाटेल ते या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार होऊ शकतं. आणि आपला म्हणजे सामान्य युजर्सचा बुद्धिभ्रम केला जाऊ शकतो. आपल्यापर्यंत खोटी माहिती पोहोचवण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. नव्हे होतोच आहे. यात फक्त व्हिडीओ फेक असतो असं नाही. तर ज्या व्यक्तीचा व्हिडीओ केलेला आहे त्याचा आवाज, हावभाव यांचीही अचूक नक्कल असते.

हेही वाचा : दिवाळीत गर्भवती महिलांनी कशी काळजी घ्यावी? प्रदूषणापासून स्वत:ला सुरक्षित कसे ठेवावे? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

एखादा व्हिडीओ डीपफेक आहे हे कसं ओळखाल?

डीपफेक व्हिडीओ कसे ओळखायचे याचा रिसर्च करत असताना अमेरिकेत २०१८ मध्ये काही तज्ज्ञांच्या लक्षात आलं की डीपफेक व्हिडीओमध्ये असलेली माणसं डोळे मिचकावत नाहीत. म्हणजेच त्यांच्या पापण्यांची उघडझाप होत नाही. पण थोड्याच दिवसात सायबर गुन्हेगारांनी तंत्रज्ञान अपडेट केलं आणि आता जे डीपफेक व्हिडीओ येतात त्यात व्यक्ती डोळे मिचकावते. काहीवेळा डीपफेक व्हिडिओची क्वालिटी अगदीच बेताची असते, त्यावरुन व्हिडीओ डीपफेक असू शकतो ही शंका उपस्थित करायला हरकत नाही. काहीवेळा इमेजच्या कडा ‘फ्लिकर’ होतात. त्यावरूनही व्हिडीओ खरा आहे की खोटा हे ठरवता येऊ शकतं किंवा निदान शंका घेता येऊ शकते. एखादा व्हिडीओ डीपफेक आहे हे शोधून काढणं तसं अवघड आहे त्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचलेल्या कुठल्याही आक्षेपार्ह आणि मनात शंका उपस्थित करणारा व्हिडीओ नक्की खरा आहे का हा प्रश्न स्वतःला विचारणं आवश्यक आहे.

हेही वाचा : Diwali 2023 : दिवाळीमध्ये फराळावर ताव मारताय? आरोग्याकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…

असा कुठलाही भावना भडकावणारा व्हिडीओ आपल्यापर्यंत पोहोचला तर लगेच प्रतिक्रिया देण्याची घाई करता कामा नये, त्याऐवजी पोलिसांची मदत घ्यावी. असा व्हिडीओ आलेला आहे त्याची सत्यता काय आहे ते तपासले पाहिजे.
एखादा व्हिडीओ बघून, फॉरवर्ड करून आपण अफवांमध्ये आणि सामाजिक अस्थिरतेत भर तर घालत नाहीयोत ना हे बघितले पाहिजे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are you watching deepfake videos how to identify deepfake videos hldc css
First published on: 14-11-2023 at 18:19 IST