मध हे एक प्रकारचे नैसर्गिक औषध आहे आणि याचे सेवन कायमच हितकारक असते. दररोज दोन चमचे मधाचे सेवन केल्याने शरीर निरोगी, उर्जावान, स्वस्थ राहते व थंडीमध्ये याचे सेवन केल्यास खूप फायदे प्राप्त होतात. थंडीत वातावरणातील गारवा आणि शरीरात होणारे बदल यासाठी मध अतिशय चांगलं असतं, असे म्हटले जाते. मधामध्ये दाहकविरोधी, औषधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे विविध रोगांवर मात करता येते.  निरोगी आरोग्यासाठी मध प्रचंड फायदेशीर मानलं जातं. मध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मधाच्या सेवनाने मधुमेह आणि साखरेवर नियंत्रण ठेवता येऊ शकते का, याच विषयावर शालीमार बाग येथील क्लिनिकल पोषण आणि आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. गीता बुर्योक यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

कॅनडातील टोरंटो विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अलीकडील अभ्यासात असे आढळून आले आहे की, मध कार्डिओमेटाबॉलिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. संशोधनानुसार, मध रक्तातील साखर नियंत्रित करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.

डाॅक्टर सांगतात, “मधामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते. यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करतात. मधामध्ये ॲंटी-ऑक्सिडेंट्ससह व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशिअम, फॉलेट आणि पोटॅशिअम यांसारखे अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मधाचे सेवन केल्याने आरोग्याला मोठे फायदे मिळतात.”

(हे ही वाचा: पोटात गॅस वाढवतात ‘हे’ ४ पदार्थ; पण ‘हा’ उपाय केल्यास मिळू शकतो झटक्यात आराम)

जर्नल न्यूट्रिशियन रिव्ह्यूजमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, संशोधकांनी १८ नियंत्रित चाचण्या आणि एक हजार १०० हून अधिक सहभागींचा समावेश केला. चाचण्यांमध्ये मधाचा सरासरी दैनिक डोस ४० ग्रॅम किंवा सुमारे दोन चमचे होता. त्यात असे आढळून आले की, एकाच फुलांच्या स्रोतातील मध शरीरावर फायदेशीर प्रभाव निर्माण करतो.

अभ्यासावर भाष्य करताना, AIIMS चे माजी सल्लागार, कार्डिओलॉजिस्ट डॉ. बिमल छाजेर म्हणाले, साखरेऐवजी कच्च्या मधाचे सेवन केल्याने रक्तातील ग्लुकोज आणि रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, कारण मध हा निसर्गात आढळणारा नैसर्गिक पदार्थ आहे आणि कोणत्याही रसायनांशिवाय तो प्रक्रिया न केलेला आहे, त्यामुळे फायदा होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवसात ३०-४५ ग्रॅम प्रक्रिया न केलेला मध सेवन केल्यास मानवी शरीरावर अनेक फायदेशीर परिणाम होऊ शकतात. चहामध्ये साखरेऐवजी मधाचा वापर केल्यास खूप फायदा होईल. हेल्दी काढ्यामध्ये मध मिसळूनही तुम्ही सेवन करू शकता, असे डॉ. छाजेर सांगतात.