Breakfast mistakes: मधुमेह हा एक असा दीर्घकालीन आजार आहे ज्यासाठी रुग्णांना रक्तातील साखर नियंत्रित करणे आवश्यक आहे. मधुमेह नियंत्रणात न राहिल्यास त्याच्या सततच्या वाढीमुळे हृदयविकार, किडनीच्या समस्या आणि दृष्टी कमी होऊ शकते. मधुमेही रुग्णांची फास्टिंग शुगर जास्त असते. फास्टिंग ब्लड शुगर वाढवण्यासाठी हार्मोन्स जबाबदार असतात. रात्री झोपताना शरीरातील हार्मोन्स नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इन्सुलिन तयार होते, त्यामुळे सकाळी उठल्यावर शरीरातील साखरेची पातळी वाढलेली जाणवते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सकाळच्या नाश्त्यामध्ये काही चुका झाल्या तर रक्तातील साखरेची पातळी अधिक वाढू शकते, जी आरोग्यासाठी घातक आहे. उच्च रक्तातील साखरेच्या रुग्णांनी नाश्ता करताना अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया मधुमेही रुग्णांनी कोणत्या चुका पुन्हा करू नये.

( हे ही वाचा: ‘या’ ३ सुक्या मेव्याचे सेवन आयुष्य वाढवेल; फक्त दिवसातून किती खाल्ले पाहिजे ते जाणून घ्या)

नाश्ता वगळू नका

मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही नाश्ता सोडू नये. मधुमेही रुग्णांची फास्टिंग शुगर जास्त असते, मधुमेही रुग्णांनी नाश्ता वगळल्यास त्रास वाढू शकतो. अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की, मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्ता केला नाही तर त्यांच्या रक्तातील साखर वाढू शकते.

नाश्त्यात प्रथिनांची कमतरता भासू देऊ नका

मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात प्रोटीनची कमतरता भासू नये. प्रथिनांचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते. प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी मधुमेहाचे रुग्ण दूध, कडधान्ये आणि ड्रायफ्रुट्सचे सेवन करू शकतात.

( हे ही वाचा: चांगले कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढवण्यासाठी ‘हे’ ४ पदार्थ बनतील औषधं; आजच वापरून पाहा)

मर्यादित फॅट देखील आवश्यक आहे

हेल्थलाइनच्या मते, मधुमेहामध्ये चरबीचे सेवन दिवसभर केलेल्या एक्टिविटी नुसार असावे. शरीरात फॅटची कमतरता देखील साखर वाढवू शकते. मधुमेहामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे सेवन कमी करावे. शरीराला व्हिटॅमिन-ए, डी, ई आणि के चरबीपासून मिळतात, जे शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात, त्यामुळे मधुमेही रुग्णांनीही आहारात चरबीचे सेवन करावे. शरीरातील चरबीची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही अंडी, मासे आणि बदाम खाऊ शकता.

ब्रेक फास्टमध्ये फायबर स्कीप करू नका

मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यामध्ये फायबरचे सेवन करणे आवश्यक आहे. फायबरचे कमी सेवन रक्तातील साखर वाढवण्यासाठी प्रभावी आहे. फायबरची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही एवोकॅडो, किडनी बीन्स, बीन्स, ब्रोकोली आणि सोयाबीनचा नाश्त्यामध्ये समावेश करू शकता. मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यामध्ये या चार गोष्टींची काळजी घेतल्यास रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetic patients must avoid these mistakes in breakfast gps
First published on: 30-11-2022 at 12:55 IST