Exercise can prevent Alzheimer’s? आपण सर्व जण कधी ना कधी काही गोष्टी विसरतो. अगदी सामान्यातील सामान्य गोष्ट असते. जसे की, घराची चावी किंवा घर बंद करणे. पण जरा कल्पना करा की, एके दिवशी तुम्ही तुमचे घरच विसरलात तर. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तुमच्या घरच्यांचा चेहरा आठवत नाही. तुम्हालाही कुटुंब आहे हे आठवत नाही. किती भयंकर गोष्ट आहे ही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही एका आजाराची लक्षणे आहेत. या आजाराचे नाव आहे अल्झायमर. हा एक मेंदूचा विकार आहे. जो स्मृती, विचार व वर्तन प्रभावीत करतो. हा स्मृतिभ्रंशाचा सर्वांत सामान्य प्रकार आहे आणि तो सामान्यतः वृद्धांना प्रभावीत करतो. दरम्यान, एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, व्यायामामुळे अल्झायमरसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रवीण गुप्ता यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना या संदर्भात अधिक माहिती दिली आहे.

शारीरिक व्यायाम करणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा व्यायाम वयानुसार मेंदूच्या संरचनेचे आणि कार्याचे संरक्षण करण्यास मदत करतो. त्यामुळे अल्झायमरसारख्या मेंदूशी संबंधित समस्यांचा धोका कमी होऊ शकतो. या अभ्यासाचे स्पष्टीकरण देताना, न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रवीण गुप्ता यांनी सांगितले की, व्यायामामुळे अल्झायमरसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

Sleeping At This Time Reduce Spike In Diabetes Type 2
मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी ‘या’ वेळी व ‘इतका’ वेळ झोपणं गरजेचं! खाणं-पिणं, व्यायामाशिवाय ‘ही’ चूक ठरते घातक
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

अल्झायमर रोगाने बाधित रुग्णांना व्यायाम कसा मदत करू शकतो?

व्यायामामुळे अल्झायमर रोगाने बाधित रुग्णांना १०० टक्के फरक पडतो, असे नाही. हा अभ्यास सिद्ध करीत नाही की, व्यायाम केल्याने अल्झायमर रुग्णांची स्थिती सुधारते. व्यायाम संभाव्य मदत करू शकतो. स्मृतिभ्रंश रोखण्यासाठी चालणे आणि व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते. खरे तर, एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, ३० मिनिटे व्यायाम केल्याने अल्झायमरचा धोका कमी होतो. व्यायामादरम्यान तयार होणारे इरिसिन हार्मोन मेंदूपर्यंत पोहोचते आणि न्यूरॉन्सचे आरोग्य व कार्य सुधारते. इरिसिन हार्मोन आपल्या मेंदूचा ऱ्हास रोखतो, मेंदूची जळजळ कमी करतो.

हा रोग तीन टप्प्यांत होतो, या रोगाचे तीन टप्पे असतात

पहिल्या अवस्थेतील अल्झायमर रोग

कोलकातामधील आनंदपूर येथील फोर्टिस हॉस्पिटलचे डॉ. अमित हलदर म्हणतात की, “सुरुवातीच्या टप्प्यात एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती कमी पडू शकते. शब्द शोधण्यात अडचण येऊ शकते किंवा नियोजन आणि व्यवस्था करण्यात अडचण येऊ शकते. त्यांची मनःस्थिती बदलू शकते, मागे हटू शकते किंवा ते आनंद घेत असलेल्या क्रियाकलापांमध्ये रस गमावू शकतात. विसरभोळेपणाच्या या टप्प्याला ‘मध्यम संज्ञानात्मक कमजोरी’, असे म्हणतात.

मध्यम अल्झायमर रोग

या टप्प्यात एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता कमी होत राहते. त्यांना कपडे घालणे, अंघोळ करणे व खाणे यांसारख्या दैनंदिन कामांमध्ये मदतीची आवश्यकता भासू शकते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदलही जाणवू शकतात. ते अस्वस्थ होऊ शकतात आणि त्यांना झोपायला त्रास होऊ शकतो.

अल्झायमर रोगाचा शेवटचा टप्पा

या शेवटच्या टप्प्यात एखाद्या व्यक्तीची इतरांशी संवाद साधण्याची क्षमता अत्यंत मर्यादित असते. त्यांना गिळण्यास त्रास होऊ शकतो, ते अंथरुणाला खिळून राहू शकतात आणि त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते.

सौम्य स्मरणशक्ती म्हणजे स्मरणशक्तीची कमजोरी असलेल्या अशा रुग्णांना हे समजत नाही की, त्यांना विस्मरणाचा आजार आहे. अशा रुग्णांना खूप चांगला व्यायाम करता येतो आणि फारसा त्रास होत नाही. कधी कधी या अवस्थेतील रुग्ण संतुलन गमावू शकतात. अशा रुग्णांनी शारीरिक व्यायाम, सामाजिक कौशल्य विकास व सामाजिक संवादावर भर दिला पाहिजे. त्यापैकी बरेच रुग्ण एकटे राहतात, लोकांशी संवाद साधत नाहीत आणि म्हणूनच त्यांना संज्ञानात्मक प्रशिक्षणाची आवश्यकता असते. ते संतुलन गमावू शकतात, व्यायाम विसरतात. विस्मरणाचा गंभीर टप्पा असा आहे की, जिथे रुग्णांना स्वत:ची काळजी आणि स्वच्छतेसाठी मदतीची आवश्यकता असते. या स्थितीत रुग्णांना कोणतेही व्यायाम नसतात आणि उपचारदेखील कार्य करीत नाहीत.

अल्झायमरच्या रुग्णांना कोणत्या प्रकारचे व्यायाम सुचवले जातात?

दिवसातून पाच वेळा सुमारे ३० मिनिटांचा व्यायाम हा अल्झायमरच्या रुग्णांना उपयुक्त ठरतो. साधे चालणेदेखील पुरेसे आहे; ज्यामुळे शरीरात रक्तप्रवाह बदलतो. पूर्वीच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे, की योग आणि ध्यान यांचा स्मृतिभ्रंशाच्या व्यवस्थापनावर परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा >> वजन कमी करण्यासाठी ‘या’ २ आसनांचा करा सराव; मानसिक ताणतणावही होईल दूर, वाचा तज्ज्ञांचा सल्ला… 

रुग्णाने व्यायाम सुरू केल्यानंतर बदल कसा दिसतो?

व्यायामामुळे काही रुग्णांमध्ये सुधारणा होत आहे. रुग्ण अधिक सक्रिय आणि सहभागी होत आहेत. अल्झायमरसारख्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी व्यायाम हा चांगला पर्याय आहे.