Holi 2024 : होळीनंतरचा रंगपंचमी सण अनेकांना खूप आवडतो. तुमच्यापैकी बहुतेक जण विविध रंग आणि पाण्याने होळी खेळतात. भारतात अनेक ठिकाणी रंगपंचमीचा एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो. यावेळी एकमेकांना रंग लावून या सणाचा आनंद घेतला जातो. पण, या रंगांमध्ये हानिकारक रसायने असतात, ज्यामुळे त्वचेचे खूप नुकसान होते. अशा परिस्थितीत बरेच लोक रंगपंचमी न खेळता घरीच राहणे पसंत असतात. पण, आता काळजी करू नका. आम्ही तुम्हाला स्किनकेअरच्या अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही होळीच्या रंगांपासून त्वचा आणि केसांची काळजी घेऊ शकता.

गुलाल हा रंगपंचमीच्या दिवशी वापरला जाणारा सर्वात पारंपरिक कोरडा रंग आहे. पण त्यातही अनेकदा पारा, तांबे किंवा निकेल यांसारखे धातू मिसळले जाऊ शकतात, ज्यामुळे त्वचेवर मुरुम, जळजळ यांसारख्या समस्या दिसू लागतात. तसेच केसही कोरडे होतात. अशा परिस्थितीत केसांची आणि त्वचेची काळजी घेण्यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना द बॉडी शॉप, इंडिया, लर्निंग अकादमी डीजीएम रजत माथूर यांनी काही उपयुक्त टिप्स दिल्या आहेत.

काही कृत्रिम रंग केस आणि त्वचेला चिकटून राहतात, जे काढणे अनेकदा कठीण असते. परिणामी त्वचेची ॲलर्जी, पुरळ आणि केसांसंबंधित अनेक समस्या उद्भवतात.

यात रंगपंचमी सहसा घराबाहेर मोकळ्या मैदानात किंवा जागेत साजरी केली जाते. अशावेळी तीव्र सूर्यप्रकाशामुळे तुमच्या त्वचेला आणि केसांना हानी पोहोचू शकते, डिहायड्रेशन, सनटॅन आणि इतर अतिनील हानी किरणांमुळे त्वचा आणि केसांचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत रंगपंचमी खेळण्याआधी आणि खेळल्यानंतर त्वचा आणि केसांची काळजी घेणे फार गरजेचे आहे.

या संदर्भात इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना स्किनक्यू अँड कोसमोडर्मा क्लिनिकच्या संस्थापिका आणि त्वचारोगतज्ज्ञ डॉ. चित्रा आनंद यांनी काही टिप्स दिल्या आहेत. त्यांच्या मते, रंगपंचमीच्या कृत्रिम रंगांमुळे त्वचेवरील बारीक छिद्र बंद होऊ शकतात, ज्यामुळे संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना मुरुम, पुरळ यांसारख्या समस्या जाणवू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, रंगपंचमी खेळण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात:

१) रंगपंचमी खेळायला जाण्याआधी त्वचेवर शिया बटर किंवा कोरफड वापरून तयार केलेल्या मॉइश्चरायझरचा जाड थर लावा. यामुळे रंगानंतर येणारा त्वचेचा कोरडेपणा रोखता येऊ शकतो.

२) त्वचा तेजस्वी दिसण्यासाठी तुम्ही टी ड्री अर्क आणि एडलवाईस अर्कापासून तयार केलेल्या तेलाचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.

३) घराबाहेर जाण्याआधी चेहऱ्यावर आणि त्वचेवर SPF 30 किंवा 50 अशा ब्रॉड स्पेक्ट्रम असलेले वॉटरप्रूफ सनस्क्रीन लावा, ज्यामुळे तुमच्या त्वचेचे अतिनील सूर्यप्रकाशापासून संरक्षण करता येईल.

४) त्याचप्रमाणे केसांची काळजी घेताना, केसांना रंग चिकटू नये आणि ते कोरडे, ठिसूळ होऊ नयेत यासाठी तुम्ही खोबरेल तेल लावून हलक्या हाताने मालिश करा.

संपूर्ण शरीर झाकले जाईल अशाप्रकारचे कपडे परिधान करा, जेणेकरून रंगांचा तुमच्या त्वचेशी थेट संबंध येणार नाही.

रंगपंचमीनंतर त्वचा आणि केसांची कशी काळजी घ्यावी?

१) रंगपंचमी खेळून झाल्यानंतर पायाच्या नखांपासून केसांपर्यंत लागलेला रंग निघता निघत नाही, अशावेळी फार चिडचिड होते. अशावेळी डॉ. आनंद यांनी दिलेल्या सल्ल्ल्यानुसार आपण त्वचा आणि केसांवरील रंग योग्यप्रकारे काढू शकतो.

२) त्वचेवरील रंग काढण्यासाठी सॉफ्ट क्लीन्सरचा वापर करा, यामुळे कसलीही ॲलर्जी न होता रंग काढता येतो. संपूर्ण शरीर स्वच्छ करून पुसून मग मॉइश्चरायझर लावा, ज्यामुळे कोरडेपणा कमी करत त्वचेला पुन्हा ओलावा निर्माण होईल आणि चिडचिड कमी होईल, पण पुढे काही दिवस न चुकता अशाप्रकारे मॉइश्चरायझरचा वापर करा. कोणत्याही प्रकारची जळजळ किंवा लालसरपणा जाणवल्यास कोल्ड कॉम्प्रेसचा वापर करा.
याशिवाय केसांसाठी अदरक, शिया बटर, मोरिंगा तेल किंवा केळी यांसारख्या घटकांचा वापर करून बनवलेल्या शॅम्पूचा वापर करा.

३) केसांच्या हायड्रेश, पोषणयुक्त ट्रेससाठी मास्क किंवा कंडिशनरचा वापर करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४) त्वचा हायड्रेशन ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. सतत चिडचिड होत असल्यास किंवा ऍलर्जी झाली असल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जा, असा सल्ला डॉ. आनंद यांनी दिला.