diabetes symptoms: मधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित आजार आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. साधारणपणे हा आजार वाढत्या वयात होतो, मात्र गेल्या काही वर्षांपासून मधुमेहाच्या आजाराने तरुण वयातील लोकांनाही आपला बळी बनवायला सुरुवात केली आहे. आकडेवारीनुसार, देशातील ७.७ कोटी लोक मधुमेहाचे बळी आहेत. म्हणजेच प्रत्येक ११ भारतीयांपैकी एकाला मधुमेह आहे.

मधुमेहाचे प्रमाण चीननंतर भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे. झिऑन लाईफसायन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. विवेक श्रीवास्तव म्हणतात की, आज ३० ते ४० वयोगटातील लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यापैकी बहुतेकांना मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे देखील दिसत नाहीत. कुटुंबातील कोणाला मधुमेह असेल तर हा धोका आणखी वाढतो. असे असूनही आहार आणि जीवनशैलीत बदल करून मधुमेह टाळता येऊ शकतो.

मधुमेह टाळण्यासाठी ५ प्रभावी मार्ग

जीवनात बदल करा

मधुमेहाचे सर्वात मोठे कारण म्हणजे बिघडलेली जीवनशैली. त्यामुळे सर्वप्रथम रोज व्यायाम किंवा कसरत करा. शरीर नेहमी तंदुरुस्त ठेवा. डॉक्टरांना भेटा आणि जर मधुमेह होण्याची शक्यता असेल, म्हणजे उपवासात रक्तातील साखर १०० च्या आसपास असेल, तर आतापासून डॉक्टरांचा सल्ला घ्या. यासाठी शरीर सक्रिय ठेवा. वजन कधीही वाढू देऊ नका. चालणे, जॉगिंग, धावणे, एरोबिक्स, नृत्य, सायकलिंग करा. तुमचे शरीर व्यस्त ठेवणारे क्रियाकलाप करा.

( हे ही वाचा: पालक आणि पनीर एकत्र चुकूनही खाऊ नका, नाहीतर भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम)

तणाव दूर ठेवा

जर तुम्ही अनेकदा तणावाखाली असाल तर तुमच्या जीवन खराब होईलच, शिवाय तुम्ही प्रीडायबेटिक देखील व्हाल. यामुळे हार्मोन्सचे संपूर्ण संतुलन बिघडते. तणावामुळे कॉर्टिसोल हार्मोन वाढतो आणि अॅड्रेनालाईनचे संतुलन बिघडते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढेल. म्हणूनच नवीन सवय लावा आणि कोणत्याही परिस्थितीत मनापासून तणाव दूर ठेवा.

आहारात आमूलाग्र बदल करा

योग्य आहार तुम्हाला रक्तातील साखरेच्या त्रासातून सहज काढू शकतो. म्हणूनच संतुलित आहार घ्या. प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समतोल असलेला आहार घ्या.शक्यतो हिरव्या ताज्या पालेभाज्या खा. जंक फूड, प्रोसेस्ड फूड यांना हात लावू नका. तुम्ही तुमच्या आहारात जितक्या जास्त हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश कराल तितके तुम्ही निरोगी राहाल.

( हे ही वाचा: ‘या’ ब्लड ग्रुपला असतो हृदयविकाराचा सर्वाधिक धोका! यात तुमचा तर सहभाग नाही ना? जाणून घ्या)

वजन नियंत्रित ठेवा

कोणत्याही परिस्थितीत, बॉडी मास इंडेक्स २५ पेक्षा जास्त होऊ देऊ नका. लठ्ठपणा वाढला तर मधुमेहाचा धोकाही वाढतो. जर तुम्हाला प्रीडायबेटिस झाला असेल तर लवकरात लवकर वजन ५ ते १० टक्के कमी करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साखरयुक्त पेय टाळा

गोड पेये किंवा साखर जोडलेल्या गोष्टी मधुमेहाच्या शत्रू आहेत. त्यामुळे सॉफ्ट ड्रिंक्स, सोडा, अल्कोहोल, बिअर इत्यादी टाळा. यामध्ये एनर्जी ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स आणि सिरपचाही समावेश आहे. या सर्वांऐवजी पाणी आणि कॉफी प्या.