नवी दिल्ली : वाढत्या वयाबरोबर अनेक शारीरिक व्याधी होण्याचा धोका असतो. विशेषत: निर्णय घेण्याच्या क्षमतेवर अधिक परिणाम होतो. तसेच स्मृतिभ्रंश व्याधीची शक्यता असते. त्यामुळे वाढते वय आणि आरोग्यासंबंधी अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे.
एका संशोधनानुसार तरुण वयात व्यायामाला सुरुवात केली आणि योग्य आहार घेतला तर भविष्यात स्मृतिभ्रंशसारख्या गंभीर आजारापासून दूर राहता येते. याच संशोधनात नियमित व्यायामाचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच वयाच्या ६० व्या वर्षी रोज २० -३० मिनिटे व्यायाम करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> वजन कमी केल्यामुळे कसा कमी होतो गुडघेदुखीचा त्रास; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
पीर रिव्ह्यूव्ह सायंटिफिक जर्नल सेलमध्ये यासंबंधी संशोधन नुकतेच प्रकाशित झाले आहे. यानुसार व्यायामामुळे आयरीसीन हे संप्रेरक निर्माण होते. त्याचा उपयोग स्मृतिभ्रंश या आजाराला दूर ठेवण्यासाठी मदत होते. आयरीसीन हे नेप्रिल्सिनचा स्तर वाढवतो. त्यामुळे मेंदूचे नुकसान करणाऱ्या असामान्य प्रथिने अमाईलॉइड बिटाचा सामाना करता येतो. या संशोधकांच्या म्हणण्यानुसार स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांनीही निमयित व्यायाम केला तर रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता असते.