राष्ट्रीय कौंटुबिक आरोग्य सर्वेक्षण २०१९-२१ नुसार अनेक भारतीय स्त्रीयांना अॅनिमियाच्या समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याचं समोर आलं आहे. संतुलित आहार न केल्यामुळे अशाप्रकारच्या आरोग्याच्या गंभीर समस्या उद्धवतात. ज्या पदार्थांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, अशाप्रकारचा डाएट केल्यास अॅनिमियाच्या समस्यांवर मात करू शकता. यामध्ये लीन मीट, सी फूड, काजू, सोयाबिन आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असणे गरजेचं असतं. अॅनिमियासाठी कोणत्या प्रकारचा आहार सुरु ठेवला पाहिजे, याबाबत नवी दिल्ली येथील मॅक्स सुपर स्पेशलिटी रुग्णालयाच्या वरीष्ठ न्यूट्रिशनिस्ट रितीका समाद्दार यांनी माहिती दिली आहे.
लोहयुक्त पदार्थांसोबतच विटॅमिस सीचे सेवन केल्यावर शरीरासाठी फायदा होतो. सकाळी नाश्ता करताना टोमॅटो चटणी आणि पालक पकोड्याचं सेवन करा. तसंच दाल वडा आणि ऑरेंज ज्यूसचाही तुम्ही आहारात समावेश करू शकता. मोड आलेल्या कडधान्यामध्ये आणि पोह्यात लिंबू पिळून सेवन करू शकता. तुमच्या नेहमीच्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश असला पाहिजे. यामध्ये काजू, बिया आणि हिरव्या पालेभाज्या असणे अत्यंत महत्वाचं असतं.
नक्की वाचा – उपवास केल्यावर वजन होतं झटपट कमी? तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घ्या
मांसाहार खाणारे लोक चिकन किंवा फिशचा आहारात समावेश करू शकतात. तसंच सोयाबिन किंवा टोफू खाणंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. तसंच अंडी खाल्यावर शरीरासाठी आवश्यक असणारी प्रथिने आणि लोह मिळण्यास मदत होते. जेवण करताना चहा आणि कॉफी पिणे टाळा. जेवण करण्याच्या एक तास आधी किंवा नंतर चहा आणि कॉफी घेऊ नका. याचं सेवन केल्यावर शरीरातील लोहाचं प्रमाण कमी होऊ शकतं.
ज्या पदार्थांमध्ये लोहाचं प्रमाण अधिक असतं अशा गोष्टींचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात करू शकता. आहार सुरु केल्यावर त्याचवेळी कॅल्शियम आणि आयर्न सप्लिमेंट्स घेऊ नका. कारण अशा गोष्टींमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. ज्या पदार्थांमध्ये बिटा कॅरोटिन म्हणजेच बिट आणि शिमला मिरचीचा आहारात समावेश करू शकता. ज्या पदार्थांमध्ये विटॅमिन बी-१२ आहे, अशा पदार्थांचं सेवन करा. ज्यामुळे लाल रक्त पेशी वाढण्यास मदत मिळते.