बैठी जीवनशैली (sedentary lifestyle) आरोग्यासाठी योग्य नाही. पण, जर आपल्या कामामुळे आपल्याला जास्त वेळ, जसे की सलग सहा तास बसून राहावे लागले तर काय? अशा परिस्थितीत शरीराचे खरोखर काय होते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? चला तर मग जाणून घेऊया…

ग्लेनिगल्स हॉस्पिटल, परळ मुंबईच्या इंटरनल मेडिसिनच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल म्हणाल्या की, “विश्रांती न घेता एकाच जागी बराच वेळ बसणे हे एकूण आरोग्यासाठी आदर्श असू शकत नाही. याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि विविध आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो, यामुळे जास्त वजन वाढू शकते, ज्यामुळे पुढे लठ्ठपणाला सामोरे जावे लागू शकते. कारण जास्त बसल्याने तुमचे चयापचय लक्षणीयरित्या मंदावते, ज्यामुळे वजन कमी करणे कठीण होते,” असे डॉ. अग्रवाल म्हणाले.

पोषणतज्ज्ञ आणि फिटनेसतज्ज्ञ शिखा सिंग यांनी सांगितले की, एकाच ठिकाणी बसून राहणे हे मधुमेहासारख्या दीर्घकालीन रोगांना कारणीभूत ठरू शकते. “कमी शारीरिक क्रिया किंवा कमी हालचाल केल्यामुळे अंतर्गत अवयवांभोवती, मुख्यतः पोटाच्या भागात आतड्याभोवती चरबी जमा होते, जी इन्सुलिनच्या क्रियेला अडथळा आणते आणि त्याचे योग्य कार्य होण्यात अडचण निर्माण करते,” असे शिखा सिंग यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने बसले असाल, जसे की वाकून बसणे तर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त वेळा पाठदुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. कालांतराने यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाबदेखील वाढू शकते. हे घटक हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका पूर्णपणे वाढवू शकतात. दीर्घकाळ बसून राहिल्यामुळे तुमच्या सांध्यांमध्ये जडपण येऊ शकते, ज्यामुळे इतके तास बसल्यानंतर हालचाल करणे कठीण होऊ शकते,” असे डॉ. अग्रवाल म्हणाले.

“ॲक्टिव्ह राहण्यासाठी तुम्ही नेहमी चार ते पाच मिनिटांचे ब्रेक घ्या. तुमचे पाय लवचिक आणि ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी तुम्ही स्ट्रेच करू शकता किंवा चालू शकता,” असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.