Virat Kohli on Anushka Sharma: किंग कोहली म्हणजेच सगळ्यांचा आवडता क्रिकेटर विराट कोहली अनेक वेळा त्याच्या आयुष्यातील अनुष्का शर्माच्या भूमिकेबद्दल बोलला आहे. आमिर खान आणि अपारशक्ती खुराना यांच्यासोबतच्या गप्पांमध्ये, त्याने एकदा सांगितलं की अनुष्काचा प्रामाणिकपणा आणि इतरांना मदत करून त्यांना सुधारण्याची इच्छा, ही गोष्टी त्याला खूप आवडतात.
तो म्हणाला, “मी नेहमी तिच्या एका गोष्टीबद्दल सगळ्यांना आवर्जून सांगतो आणि ती गोष्ट मला फार आवडते. जी म्हणजे तिचा प्रामाणिकपणा. म्हणूनच मी तिच्याशी खूप जोडलेलो आहे, कारण ती नेहमी मनातलं बोलते. आमच्या नात्यात समजूतदारपणा खूप चांगला आहे. कोणताही दिखावा नाही. तिला आजूबाजूच्या लोकांना सुधारताना बघायला आवडतं. आणि हाच बदल माझ्यातही झाला. मी जवळजवळ सगळं तिच्याकडून शिकलोय.”
आमिर खान, ज्याने ‘पीके’मध्ये अनुष्कासोबत काम केलं, तोही सहमत झाला. तो म्हणाला, “अनुष्का खूप मृदू आणि छान स्वभावाची आहे. ती खूप प्रामाणिक आणि थेट बोलणारी आहे.”
एक प्रामाणिक आणि नेहमी सुधारायला मदत करणारा जोडीदार असणं उपयोगी ठरतं.
स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन देणारा आणि प्रामाणिकपणे संवाद करणारा जोडीदार असणं, वैयक्तिक विकास आणि नात्याची गुणवत्ता दोन्ही वाढवायला मदत करतं. “अशा गोष्टींमुळे एक सकारात्मक वातावरण तयार होतं, जिथे दोघेही चांगल्या भविष्यासाठी, बदलण्यासाठी आणि एकमेकांना मदत करण्यासाठी प्रेरित होतात. ही एक स्पेस तयार करणं आहे जिथे दोघेही व्यक्ती म्हणून पुढे जाऊ शकतात,” असं डॉक्टर चांदनी तुगनाईत (सायकोथेरपिस्ट, कोच, आणि हीलर, Gateway of Healing च्या संस्थापक आणि संचालक) यांनी सांगितलं.
असं नातं दीर्घकालीन यशासाठी कसं मदत करतं ते पाहू या…
भविष्यातील ग्रोथसाठी दृष्टिकोन विकसित करणे: तुमच्या स्वतःच्या सुधारणा उद्दिष्टांना सक्रियपणे पाठिंबा देणारा जोडीदार तुमच्या ग्रोथचा दृष्टिकोन तयार करायला मदत करतो. “हा दृष्टिकोन असं मानतो की मेहनत आणि चिकाटीने कौशल्ये आणि बुद्धिमत्ता वाढवता येते. त्यामुळे तुम्ही आव्हानं स्वीकारायला शिकता. अपयशाची भीती वाटण्याऐवजी, तुम्ही ते शिकण्याची आणि सुधारण्याची संधी म्हणून पाहायला लागता,” असं डॉक्टर तुगनाईत यांनी सांगितलं.
भावनिक जवळीक वाढवणे: प्रामाणिक संवाद ही भावनिक जवळीक वाढवण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. “जेव्हा जोडीदार आपल्या भावना, गरजा आणि इच्छा खुल्यापणे सांगतो, तेव्हा विश्वास आणि मोकळेपणाचं वातावरण तयार होतं. अशा प्रकारचा संवाद भावनिक नातं मजबूत करतो आणि दोघांनाही समोरचा माणूस आपलं ऐकतोय आणि समजून घेतोय असं वाटू लागतं,” असं डॉक्टर तुगनाईत यांनी सांगितलं.
उपयुक्त सल्ला देणे: जेव्हा एखादं मत प्रेमाने आणि आदराने दिलं जातं, तेव्हा प्रामाणिक मत मोलाचं ठरतं. एक प्रेमळ जोडीदार जेव्हा तुमचं वर्तन आणि कृती यावर विचार करायला लावणारा उपयुक्त सल्ला देतो, तेव्हा तो वैयक्तिक विकासात मदत करतो. डॉ. तुगनाईत म्हणाल्या की, असा सल्ला स्वतःबद्दल जागरूकता वाढवतो आणि तुमच्या वैयक्तिक जीवनात व नात्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतो.
जबाबदारीची जाणीव निर्माण करणे: नात्यातील जबाबदारी म्हणजे फक्त वचन पाळणं नाही. तुमच्या कृती, निर्णय आणि वैयक्तिक उद्दिष्टांसाठी तुम्हाला जबाबदार धरणारा जोडीदार तुमच्यात जबाबदारीची भावना वाढवतो. “आपल्या निर्णयांवर ठाम राहण्यासाठी दिलं जाणारं हे प्रोत्साहन शिस्त आणि विश्वासार्हता निर्माण करतं, जे वैयक्तिक विकास सुधारतं आणि नात्यात विश्वास मजबूत करतं,” असं डॉ. तुगनाईत म्हणाल्या.
स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन देणारा आणि प्रामाणिकपणा पाळणारा जोडीदार कोणत्याही नात्यासाठी खूप मौल्यवान असतो. अशा गुणधर्मांमुळे व्यक्तीचा विकास होतो आणि नातं मजबूत व आरोग्यदायी राहायला मदत होते.