White Teeth Home Remedies:  आपले दात पांढरेशुभ्र असावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते. दात तुमच्या हास्य आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. पांढऱ्या मोत्यासारखे तेजस्वी दात केवळ सुंदरच दिसत नाहीत, तर तुमच्या तोंडाच्या आरोग्याबद्दलही सांगतात. वयानुसार आपले दात पिवळे होऊ लागतात. त्याशिवाय खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि तोंडाची स्वच्छता न ठेवल्यामुळे दातांवर अस्वच्छतेचा पिवळट थर साचतो. पिवळे दात केवळ तुमच्या सौंदर्यातच अडथळा निर्माण करीत नाहीत, तर ते दात, हिरड्या यांच्याशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांनाही आमंत्रण देऊ शकतात. जर तुम्ही रोज ब्रश करीत असाल आणि तरीही तुमचे दात स्वच्छ नसतील, तर तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी दात स्वच्छ करण्यासाठी काही सोपे घरगुतीय उपाय सांगितले असल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

१. दात पांढरे आणि चमकदार करण्यासाठी तीळ किंवा नारळाचे तेल वापरणे ही एक नैसर्गिक पद्धत आहे. याला ‘तेल काढणे’ म्हणतात. या पद्धतीने तोंडात तेल फिरवून दात स्वच्छ केले जातात, ज्यामुळे दात पांढरे होतात. तेल १०-२० मिनिटे आपल्या दात आणि हिरड्यांमधून हळुवारपणे फिरवा. तेल दुधाळ पांढरे होईपर्यंत फिरवत राहा. यामुळे बॅक्टेरिया मारण्यास मदत करते, ज्यामुळे तोंड स्वच्छ राहते.

२. कडुलिंबाचा उपयोग जुन्या काळापासून केला जात आहे. आयुर्वेदामध्ये कडुलिंबाला खूपच फायदेशीर सांगितले गेले आहे. असे मानले जाते की, दात साफ करण्यासाठी कडुलिंबाच्या काडीचा वापर केल्यास दात स्वच्छ आणि मजबूत राहतात. त्याच्या वापराने पचनक्रियादेखील सुधारते. कडुलिंबाची काडी दात घासण्यासाठी सर्वांत चांगली मानली जाते. त्यामागे हे कारण आहे की, कडुलिंबाच्या काडीपासून नियमित दात साफ केल्यास हिरड्यांना मजबुती येते आणि दात साफ राहतात.

३. फक्त दात घासले म्हणजे तोंडाची स्वच्छता झाली, असं नाही. जिभेची स्वच्छता करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दिवसातून दोन वेळा तुम्ही दात घासत असाल, तर दोन्ही वेळा तुम्ही जीभही स्वच्छ केली पाहिजे. तुम्ही सकाळ-संध्याकाळ जर ही गोष्ट पाळलीत, तर तुमच्या आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतील.

४. तोंडाच्या आरोग्यासाठी माउथवॉशची खूप मदत होऊ शकते. त्यामुळे तोंडातील हानिकारक जीवाणू आणि जंतू नष्ट करण्यास मदत होते. तसेच, तोंडातील पोकळी आणि प्लेक रोखण्यासाठीसुद्धा हे माउथवॉश उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे श्वासाचा ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. दिवसातून दोनदा ब्रश करणे आवश्यक आहे. त्यामुळे दातांमध्ये घाण जमा होत नाही. दात रोज घासल्याने ते किडतदेखील नाहीत. सकाळी आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासावेत, असा सल्लाही भावसार यांनी दिला.