अपचनापासून ते रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्यासारख्या विविध समस्यांवर उपाय म्हणून लवंगचे पाणी एक नैसर्गिक उपाय म्हणून लोकप्रिय होत आहे. लवंग पाण्यात भिजवून बनवलेल्या या साध्या पाण्यात लवंगमधील सक्रिय संयुगे, जसे की युजेनॉल असते, ज्यामुळे त्याच्या संभाव्य फायद्यांसाठी अनेकदा चर्चा होते. पण जर तुम्ही दोन आठवडे दररोज रात्री लवंगचे पाणी प्यायले तर खरोखर शरीरावर काय परिणाम होईल?

एका इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये, कंटेंट क्रिएटर डॉ. एरिक बर्ग असे सांगितले की,, “लवंगमध्ये युजेनॉल नावाचे संयूग असते, जे तुम्हाला एक अद्भुत झोप येण्यासाठी नैसर्गिक शामक (natural sedative) म्हणून काम करू शकते.” याबाबत तज्ज्ञांचे काय मत आहे जाणून घेऊ या.

दोन आठवडे रात्री लवंगचे पाणी प्यायल्याने विशिष्ट आरोग्य फायदे मिळण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.

कन्सल्टंट डायटिशियन आणि प्रमाणित मधुमेह शिक्षक कनिका मल्होत्रा इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगतात, “दोन आठवडे रात्री लवंगचे पाणी प्यायल्याने अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. ते पाचक एंजाइम्सना उत्तेजित करते ज्यामुळे पोटफुगी कमी होते आणि आतड्याचे कार्य सुधारून पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले लवंगचे पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, शरीराला संसर्ग आणि हंगामी आजारांशी लढण्यास मदत करते.”

हे चयापचय वाढवून आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करून वजन व्यवस्थापनात देखील मदत करू शकते, ज्यामुळे भूक नियंत्रित करण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, लवंगचे पाणी श्वसनाचे आरोग्यासाठी देखील फायदे देते कारण ते नैसर्गिक कफनाशक म्हणून काम करते, श्लेष्मा साफ करते आणि खोकल्याची उबळ आल्यास ती शांत करते. एकंदरीत, तुमच्या रात्रीच्या दिनचर्येत लवंगचे पाणी समाविष्ट केल्याने पचन, रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूण आरोग्य सुधारते, असे मल्होत्रा ​​सांगतात.

सलग दोन आठवडे लवंगचे पाणी पिण्यामुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम किंवा धोके (Potential side effects or risks associated with consuming clove water for two weeks straight)

लवंगचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी, दोन आठवडे नियमित सेवन केल्याने त्याचे संभाव्य दुष्परिणाम लक्षात घेतले पाहिजेत. “काही व्यक्तींना खाज सुटणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या ऍलर्जीक प्रतिक्रिया येऊ शकतात. लवंग रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते, ज्यामुळे मधुमेहाची औषधे घेणार्‍यांसाठी धोका निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे हायपोग्लाइसेमिया होण्याची शक्यता असते.”

याव्यतिरिक्त, लवंगमधील युजेनॉल रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढवू शकते, विशेषतः रक्त पातळ करणारी औषधे घेणार्‍या व्यक्तींसाठी आहे. जास्त प्रमाणात सेवन केल्याने कालांतराने यकृताच्या आरोग्यावरही ताण येऊ शकतो. जर तुम्हाला काही आजार असतील किंवा तुम्ही औषधे घेत असाल तर लवंगचे पाणी कमी प्रमाणात सेवन करणे आणि पात्र क्लिनिकल आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे,” यावर मल्होत्रा यांनी ​​भर दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लवंगचे पाणी विविध आहाराच्या सवयी आणि आरोग्याच्या स्थितींशी संवाद साधू शकते, त्यामुळे काही व्यक्तींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. “मधुमेह असलेल्यांनी त्यांच्या रक्तातील साखरेचे बारकाईने निरीक्षण करावे, कारण लवंग साखरेचे प्रमाण कमी करू शकते आणि हायपोग्लाइसेमिया होऊ शकतो, विशेषतः मधुमेहाच्या औषधांबरोबर लवंगचे पाण्याचे सेवन टाळावे. वॉरफेरिन (warfarin,) सारखी अँटीकोआगुलंट औषधे (anticoagulant medications) घेणाऱ्या व्यक्तींनी लवंगचे पाणी पिणे टाळावे कारण त्यात रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो,” मल्होत्रा सांगतात.