High Heels Side Effects: फॅशन का है ये जलवा, असं म्हणत रँपवर कॅटवॉक करत चालणाऱ्या मॉडेल्स बघताना भान हरपतं. पेन्सिल हिल्स घालून या मॉडेल्स नेमक्या चालतात कशा हा प्रश्ने नेहमीच पडतो. पार्टी असो किंवा कॉर्पोरेट मीटिंग, हाय हिल्स हा महिलांच्या पेहरावाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या हिल्स उपलब्ध आहेत आणि महिलाही त्यांच्या आवडीनुसार त्यांची खरेदी करत असतात. उंच, स्टायलिश व ग्लॅमरस दिसण्यासाठी अनेक महिला हाय हिल्सच्या चपला वापरतात. हाय हिल्सच्या चपलांमुळे व्यक्तीमत्वात बदल दिसतो. हाय हिल्समुळे तुम्ही केवळ उंचच दिसत नाही तर दिमाकदार आणि कॉन्फिडंटही वाटता. मात्र त्यांच्या सततच्या वापरामुळे पायांचे दुखणे वाढते, कधीकधी लागूही शकते. या हिल्सचा तुमच्या एकंदरीत शरिरावर वाईट परिणाम होतो.

पाय दुखणे –

उंच टाच किंवा सँडलमुळे पाय आणि पायाची बोटे खूप दुखू शकतात, कारण यामुळे पाय आणि बोटांवर खूप दबाव येतो, ज्यामुळे पाय दुखण्यासोबत सूज येण्याची समस्या असू शकते.

घोट्याच्या दुखण्याची समस्या –

उंच टाचांमुळे घोट्याचा त्रास होऊ शकतो. तुमचा घोटा सुजू शकतो आणि तुम्ही त्यावर कोणतेही वजन टाकू शकत नाही. पायाला वळण लागल्याने घोट्याला दुखापत होण्याचा धोका सर्वाधिक असतो

गुडघेदुखी –

उंच टाचेच्या चपला घातल्यानेही गुडघेदुखी होऊ शकते. हाय हिल्स घातल्यायामुळे गुडघ्यावर दाब खूप वाढतो. ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास गुडघेदुखीची तक्रारही होऊ शकते.

पाठ दुखणे –

हाय हिल्स घातल्याने मणक्यात चमक येऊ शकतो, ज्यामुळे कालांतराने पाठदुखी होऊ शकते.

हाय हिल्समुळे पायांना होतोय त्रास ? हे उपाय नक्की करुन पहा

पेशींचा व्यायाम –

जर तुम्ही हाय हिल्सच्या चपला किंवा सँडल्स रोज वापरत असाल तर तुम्हाला पायांचा आणि मांसपेशींचा व्यायाम करणे आवश्यक आहे. प्रत्येक पायाचा व्यायाम किमान 1 मिनिटं तरी करा. हा व्यायाम दिवसातून 2 ते 3 वेळा करणे महत्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या पायाच्या पेशी रिलॅक्स होतील व पायाचे दुखणे कमी होईल. तसेच हिल्समुळे काही लागण्याचा धोकाही कमी होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिल्स खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा –

जेव्हा तुम्ही हाय हिल्सच्या चपला अथवा सँडल्स विकत घ्यायला जाल, तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या पायाच्या आकारानुसार चप्पल घ्या. खूप घट्ट किंवा खूप सैल चप्पल घेऊ नका. घट्ट चपलेमुळे पायांवर ताण येऊ शकतो. आणि चप्पल खूप सैल असेल तर चालताना पाय वाकडातिकडा पडून पाय मुरगळण्याची किंवा तुम्हाला लागण्याचा धोका असतो.