Viral Video : सध्या हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यात ताप, सर्दी खोकल्याचा त्रास जास्त उद्भवतो. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी हिवाळ्यात आप्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. एकदा सर्दी खोकल्याचा त्रास उद्भवला की लवकर बरा होत नाही. विशेषत: जेव्हा सर्दी होते, तेव्हा शिंकण्याचा अधिक त्रास होतो. तुम्हाला सुद्धा खूप शिंका येतात का? जर हो, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका योग शिक्षिकेने शिंका येत असेल तर त्यावर उपचार म्हणून काही उपाय घरी करण्यास सांगितले आहे. हे उपाय केल्यानंतर काय फायदे होतात याविषयी सुद्धा सांगितले आहे. (if you sneeze frequently try these things and get benefits)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एका योग शिक्षिका प्रणाली कदम दिसेल. त्यांनी वारंवार शिंका येत असेल तर खालील उपाय करण्यास सांगितले आहे. त्यांनी खालील उपाय करून सुद्धा दाखवले आहे.

व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –

१ गालाची हाडाची मसाज करा – एक मिनिट
यामुळे सायनसची रक्तसंचय दूर करण्यास मदत होते.

२. बोटाने दाब देणे – एक मिनिट
यामुळे रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते

३. प्रेशर पॉइंटवर दाब – ३० सेकंद
सायनसचा दाब कमी करण्यास मदत करते.

४. नासिका सेतू – १ मिनिट
नाकाचा भाग साफ करण्यास मदत होते.

५. भुवया पिंच करणे – १ मिनिट
डोकेदुखी, डोळे दुखीपासून आराम मिळण्यास मदत होते.

हेही वाचा : Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

yogpranali या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोण कोण हे उपाय करत ते कमेंट मध्ये सांगा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूपच छान माहीती” तर एका युजरने लिहिलेय, “खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली तुम्ही धन्यवाद” आणखी एका युजरने लिहिलेय, “आम्हाला हे माहिती नव्हते, आम्ही आता हे नक्की करू” एक युजर लिहितो, “खरंच फरक पडतो मॅम मला खूप त्रास होता. सर्दी, डोके, डोळे पण दुखत होते, आता त्रास कमी दिसत आहे.” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहेत.