बदलते ऋतू, हार्मोन्समध्ये होणारे बदल आणि खराब आहार यांमुळे लोकांना त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. मुरुम आणि पुरळ ही आजकाल त्वचेची सामान्य समस्या बनली आहे. यामुळे केवळ आपल्या सौंदर्यावरच परिणाम होत नाही तर काही वेळा लोकांचा आत्मविश्वासही कमी होतो. एखाद्या व्यक्तीच्या आहाराचा परिणाम त्याच्या त्वचेवर दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अनेकदा असं होतं की तुम्हाला कुठेतरी बाहेर फिरायला जावं लागतं पण अचानक त्वचेवर पिंपल आला की, लोक त्याबद्दल नाराज होतात. पण चेहऱ्यावरचा तो अचानक झालेला मुरुम रात्रभर बरा होऊ शकतो. अचानक होणाऱ्या मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पिंपल पॅच वापरू शकता. हे तुम्हाला कोणत्याही मेडकिल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होईल.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
man died due to lightning fall in unseasonal stormy rain
बुलढाणा : वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचवण्यासाठी ‘पोकलॅन’खाली आसरा घेतला; मात्र…
ed recruitment 2024 sarkari naukri officer job in ed full form needs qualification apply enforcement directorate gov in
ED Sarkari Job: ईडीमध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी! फक्त ही पात्रता आहे आवश्यक, मिळू शकतो १,५१,००० पर्यंत पगार
Panvel water
‘पिण्यासाठी पाणी द्या, मग पाणी बचतीचा संदेश द्या’

पिंपल पॅच असे वापरा

चेहऱ्यावरील मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी झोपण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा आणि नंतर त्यावर मॉइश्चरायझर वापरा. आता हा पॅच चेहऱ्याच्या प्रभावित भागावर लावा. त्यानंतर सकाळी उठून ते चेहऱ्यावरून काढून टाका.

जेव्हा तुम्ही पॅच काढाल तेव्हा तुम्हाला दिसेल की मुरुम कमी झाला आहे आणि तुमची त्वचा कधीही स्वच्छ दिसेल. पॅच काढल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. आम्ही तुम्हाला सांगतो की जर मुरुम जास्त जाड आणि लाल असेल तर तो बरा होण्यासाठी रात्रीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

पॅच म्हणजे नक्की काय आहे?

त्वचा तज्ञ नेहमी पॅच फक्त रात्री वापरण्याची शिफारस करतात. सॅलिसिलिक ऍसिड, बेंझॉयल पेरोक्साइड, अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड, टी ट्री ऑइल यासह विविध आवश्यक पोषक तत्वांचा वापर ते तयार करण्यासाठी केला जातो. रात्री पॅच वापरल्यानंतर सकाळी सूर्यप्रकाशात जाणे टाळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चेहऱ्यावर सनस्क्रीन देखील वापरू शकता. तथापि, पिंपल पॅच वापरण्यापूर्वी, एकदा आपल्या त्वचा तज्ञाचा सल्ला घ्या.