इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी Fisker ने लॉस एंजेलिस ऑटो शो २०२१ मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार Ocean SUV सादर केली आहे. Fisker या कंपनीने SUV ही इलेक्ट्रिक कार त्यांच्या प्रोटोटाइप सारखीच ठेवली आहे. कारण त्याच्या दमदार लूक तरुणाईला खूप आवडतो. जर तुम्ही या SUV च्या पॉवर रेंजबद्दल बोलायचं झालं तर Ocean SUV ही इतर इलेक्ट्रिक कारपेक्षा कमी नाही. चला तर मग जाणून घेऊया या SUV बद्दल…

फिस्कर ओशन इलेक्ट्रिक कार तीन प्रकारांमध्ये केली लॉंच

SUV ही इलेक्ट्रिक कार तीन व्हेरियंटमध्ये लॉंच करण्यात आली आहे. ज्यामध्ये या कारच्या टॉप व्हेरिएंटची रेंज एका चार्जमध्ये ५६३ किमी आहे. यासोबतच, तुम्हाला फिस्कर ओशन एसयूव्हीमध्ये १७.१-इंच इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे. याशिवाय कंपनीने या एसयूव्हीला चार्ज करण्यासाठी छतावर सोलर पॅनल्सही दिले आहेत. जे कंपनीच्या दाव्यानुसार वार्षिक २४१४ किमीच्या ड्रायव्हिंग रेंजसाठी वीज निर्माण करण्यास सक्षम आहे.

फिस्कर ओशन एसयूव्ही किंमत

कंपनीने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून लॉस एंजेलिस ऑटो शो २०२१ मध्ये ही इलेक्ट्रिक कार लॉंच करण्याची घोषणा केली. जर या SUV च्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या स्पोर्ट व्हेरिएंटची किंमत २७.९ लाख रुपये आहे. त्याच बरोबर त्यांच्या दुसऱ्या अल्ट्रा व्हेरिएंटची किंमत ३७.२० लाख रुपये आहे आणि एक्सट्रीमच्या टॉप व्हेरिएंटची किंमत ५१.३४ लाख रुपये आहे.

फिस्कर ओशन एसयूव्हीची वैशिष्ट्ये

कंपनीने ही SUV कार अतिशय मस्क्युलर बॉडीसह सादर केली आहे. यामध्ये तुम्ही अलॉय व्हील आणि एलईडी डीआरएलने सुसज्ज शार्प आणि पातळ हेडलाइट दिले गेले आहेत. त्याचबरोबर पर्यावरण लक्षात घेऊन कंपनीने या एसयूव्हीचे इंटीरियर रिसायकल मटेरियलसह विकसित केले आहे. तसेच यात कारच्या छतावर सोलर पॅनेल बसवले आहेत, जे SUV ला एका वर्षात २४१४ किमीची रेंज देते. याशिवाय, SUV मधील १७.१-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले व्हर्टिकली सेट केला आहे, तसेच यात एक बटण दाबून तुम्ही ती क्षैतिज(हॉरिजॉन्टल) स्थितीत फिरवला जाऊ शकतो. कंपनी त्याला “हॉलीवूड मोड” म्हणत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिस्कर ओशन एसयूव्हीची पॉवर

या SUV च्या स्पोर्ट व्हेरियंटमध्ये असलेली मोटर २७५ हॉर्सपॉवरची कमाल पॉवर जनरेट करते आणि २५० मैल रेंज वितरीत करण्यास सक्षम आहे. अशातच दुसऱ्या अल्ट्रा व्हेरियंटला ५४० हॉर्सपावर मिळेल आणि रेंज ३४० मैल. तर एक्सट्रीमच्या मॉडेल ५५० हॉर्सपावर आणि ३५० मैल श्रेणीने सुसज्ज असणार आहे.