टेक्नोचे स्मार्टफोन भारतात लॉंच; स्मार्टफोन खरेदीवर मिळणार मोफत इयरबड्स!

२६ जुलैपासून सुरू होणार्‍या Amazon prime day सेल मध्ये खरेदीसाठी tecno camon 17 आणि tecno camon 17 pro हे स्मार्टफोन उपलब्ध करणार आहेत.

tecno camon 17 आणि tecno camon 17 pro असे दोन स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत.

टेक्नो कंपनीकडून या आठवड्यात tecno camon 17 सिरिज भारतात लॉंच करण्यात आली आहे. कंपनीने या सिरिजमध्ये tecno camon 17 आणि tecno camon 17 pro असे आणखीन दोन स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. तर हे दोन्ही स्मार्टफोन तुम्हाला २६ जुलैपासून सुरू होणार्‍या Amazon prime day सेलमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत . यातील tecno camon 17 pro या मोबाईल खरेदीवर tecno Ear buds1 मोफत मिळणार आहे.

Tecno Camon 17 आणि Tecno Camon 17 Pro ची किंमत

Tecno camon 17 या स्मार्टफोनची किंमत १२,९९९ इतकी आहे. हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येणार आहे. tecno camon 17 pro या स्मार्टफोनची किंमत १६,९९९ इतकी असून यात 8 जिबी राम आणि १२८ जिबी स्टोरेजसह लवकरच तुम्हाला घेता येणार आहे. हे दोन्ही फोन तुम्हाला २६ जुलैपासून भारतात विकत घेता येणार आहे.

Tecno camon 17 चे स्पेसिफिकाशन

Tecno Camon 17 हा स्मार्टफोन 1600 X 720 पिक्सल रेझोल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या 90Hz आयपीएस एलसीडी डिस्प्लेवर लाॅन्च करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित हायओएस 7.6 सह आक्टाकोर प्रोसेसर तसेच मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेटवर चालतो. या फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते.

Tecno Camon 17 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 16 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स तसेच 2 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 5,000एमएएचची बॅटरीला सपोर्ट करतो.

Tecno Camon 17 Pro चे स्पेसिफिकाशन

Tecno Camon 17 Pro स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 × 2460 पिक्सल रेझोल्युशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या टेक्नो स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक Helio G95 SoC देण्यात आली आहे. हा फोन Android 11 आधारित HiOS कस्टम युआयवर चालतो. या फोनमध्ये सिक्युरिटीसाठी पाॅवर बटणमध्ये एम्बेडेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Tecno Camon 17 Pro मधील क्वॉड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 48 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या टेक्नो फोनमध्ये 33W फास्ट सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tecno camon 17 and tecno camon 17 pro launched at a budget price get 48 megapixel selfie camera free tecno ear buds scsm

ताज्या बातम्या