धुळवडीचा रंग काढण्यासाठी या सोप्या टिप्सचा करा वापर

नैसर्गिक रंगाचा वापर केला तर त्वचेला नुकसान पोहोचत नाही

त्वचेवरील रंग काढण्याच्या टिप्स

धुलिवंदन म्हटले की प्रत्येक जण रंगात न्हाउन निघण्यासाठी फार उत्साही असतो. अनेकजण विविध रंग एकमेकांना लावून धुलिवंदनाचा आनंद साजरा करतात. अशा वेळी नैसर्गिक रंगाचा वापर केला तर त्वचेला नुकसान पोहोचत नाही. पण अनेकदा रासायनिक रंग वापरल्याने रंग त्वेचेच्या आत पर्यंत जातो. हा रंग काढायचा कसा हा मोठा प्रश्न अनेकांसमोर उभा राहतो. चला जाणून घेऊया त्वचेवरील रंग काढण्याच्या काही टिप्स-

* धुलिवंदन खेळून आल्यावर गरम पाण्याने अंघोळ न करता थंड पाण्याचा वापर करुन अंघोळ करावी. जेणे करून त्वचेवर लागलेला रंग लवकर निघेल

* लिंबाचा रस आणि मध सम प्रमाणात एकत्र करून रंग असलेल्या ठिकाणी चोळा

* हळद, बेसन, दही आणि ऑलिव्ह ऑइल या नैसर्गिक घटकांचा फेस पॅक बनवा. धुलिवंदन खेळून आल्यानंतर तो लावा.

* पपईची पेस्ट, मुलतानी माती आणि मध यांचा देखील फेसपॅक बनवून तो रंग लागलेल्या ठिकाणी लावी.

* एखाद्या अँटीसेप्टिक क्रिमने रंग असलेल्या जागी मसाज करा.

* शक्य असल्यास रंग काढण्यासाठी गुलाबपाण्याचा वापर करा.

याशिवाय, धुलिवंदन खेळायला जाण्यापूर्वी त्वचेला काही गोष्टी लावून त्वचेची काळजी घेतली जाऊ शकते. चला जाणून घेऊया त्वचेचे रक्षण करण्यासाठी धुलिवंदन खेळण्याआधी घ्यायची काळजी…

* घरातून बाहेर पडण्यापूर्वी संपूर्ण त्वचेला वॉटरप्रुफ सनस्क्रीन लावावे. जेणेकरून, सुर्याच्या किरणांपासून तुमचे संरक्षण होईल.

* रंग विकत घेताना ते नैसर्गिक आणि त्वचेला हानी पोहचवणारे नसतील, हे पाहूनच खरेदी करावेत

* याशिवाय, संपूर्ण अंगावर मॉईश्चर किंवा तेल जास्त प्रमाणात चोपडून घ्यावे. त्यामुळे रंग अंगाला चिटकून बसणार नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tips to remove holi colour from skin