जेव्हा शरीरातील यूरिकअॅसिड अनियंत्रित होते, तेव्हा हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंड निकामी होणे आणि अवयव निकामी होणे यासारख्या जीवघेण्या परिस्थिती उद्भवू शकतात. त्यामुळे युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मेडिकल न्यूज टुडेच्या माहितीनुसार, शरीरातील यूरिक ऍसिडची पातळी कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश केला पाहिजे ज्यामुळे शरीरातील प्युरीनची पातळी वाढत नाही. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही पदार्थांबद्दल, ज्यामुळे शरीरातील यूरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात राहते.

प्युरीन वाढवणाऱ्या पदार्थांवर नियंत्रण ठेवा

प्युरिन हे एक रसायन आहे जे जवळजवळ सर्व पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या आढळते, परंतु काही पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात असते. ट्यूना, सार्डिन या माशांमध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते. याशिवाय अल्कोहोल, बिअर आदी पदार्थही शरीरातील युरिक अॅसिड वाढवण्यास कारणीभूत असतात. दुग्धजन्य पदार्थ, लाल मांस, उच्च चरबीयुक्त पदार्थ देखील प्युरीनची पातळी वाढवतात.

( हे ही वाचा: Uric Acid च्या रुग्णांनी ‘या’ गोष्टींचा आहारात समावेश करा, यूरिक अॅसिडची पातळी झपाटयाने होईल कमी)

सांधेदुखीमध्ये चेरी फायदेशीर आहे

चेरीमुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. एका संशोधनात असे आढळून आले आहे की चेरीच्या सेवनाने सांधेदुखीचा त्रास कमी होतो. चेरीमध्ये अँथोसायनिन्स नावाचे नैसर्गिक दाहक-विरोधी संयुग असते जे यूरिक अॅसिडची पातळी कमी करते.

व्हिटॅमिन सी शरीर डिटॉक्स करते

एका अभ्यासात असे आढळून आले आहे की व्हिटॅमिन सी यूरिक ऍसिडची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे लिंबू आणि संत्र्याच्या सेवनावर नियंत्रण ठेवता येते. लिंबू आणि संत्र्यामध्ये सायट्रिक ऍसिड असते. हे शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी संधिवाताची समस्या कमी करते.

( हे ही वाचा: कॅन्सर हाडांमध्ये पसरू लागल्याची ‘ही’ ३ लक्षणे वेळीच ओळखा, नाही तर जीव देखील गमवावा लागू शकतो)

केळ्यामध्ये असलेले केटोन्स युरिक अॅसिड कमी करतात

केळीमध्ये कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरात केटोनची पातळी वाढते. केटोन्स युरिक ऍसिडचे उत्पादन नियंत्रित करतात. केळीच्या नियमित सेवनाने शरीरातील यूरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात राहते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युरिक अॅसिडयुरिक कमी करण्यास सफरचंद आहे फायदेशीर

सफरचंदात भरपूर फायबर असते. तसेच, यामध्ये असलेले अॅसिड युरिक अॅसिडचा प्रभाव कमी करते. सफरचंदात मॅलिक अॅसिड मुबलक प्रमाणात आढळते. एलिमेंटल अॅसिड रक्तातील यूरिक ऍसिड कमी करण्यास मदत करते. उच्च यूरिक अॅसिडचा त्रास असलेल्या रुग्णांनी दररोज सफरचंद खावे.