ट्विटरवर लवकरच सुरू होणार शॉपिंग सेक्शन….

ट्विटरवर वापरकर्ते उत्पादनांविषयी चर्चा करत असतात. आता ट्विटरवर फक्त चर्चा नाही तर शॉपिंगही करता येणार आहे.

छोट्या ब्रँडसह या फिचरची चाचणी सुरु (प्रातिनिधिक फोटो)

इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांनी आधीच अॅपमध्ये खरेदीची सुविधा दिलेली आहे. आता यामध्ये ट्विटरही लवकरच सामील होत आहे. ट्विटर अ‍ॅपमध्ये लवकरच विविध ब्रँडसह नवीन शॉपिंग सेक्शन सुरु होणार आहे. ट्विटर या नवीन फिचरची चाचणी करीत आहे. यामुळे व्यवसाय असणाऱ्यांंना  त्यांच्या प्रोफाइलच्या वरच्या बाजूला शॉपिंग सेक्शन जोडण्याची परवानगी दिली जाईल. सोशल नेटवर्किंग जायंटने नमूद केले आहे की सध्या ही पायलट चाचणी इंग्रजीमध्ये सेवा वापरणाऱ्या लोकांसाठी iOS डिव्हाइसेस पुरती मर्यादित असेल. उत्पादनावर टॅप करून लिंकद्वारे ट्विटरवरून अन्य कोणत्याही ठिकाणी न जाता ट्विटरवरचं खरेदी करण्याचा पर्याय असू शकेल.

नवीन फिचरसाठी चाचण्या सुरु

फिचर बद्दल बोलताना ट्विटरने म्हटले आहे की, “लोक ट्विटरवर दररोज उत्पादनांविषयी चर्चा करतात. म्हणूनच त्यांना या उत्पादनाची  प्रत्यक्षात  खरेदी करता यावी यासाठी हे फिचर काम करेल.  याबद्दल आम्ही उत्सुक आहोत.” ट्विटरने असेही म्हटले आहे की सध्या ते छोट्या ब्रँडसह या फिचरची चाचणी करीत आहेत.यामध्ये गेमस्टॉप, आर्डेन कोव्ह आणि अमेरिकेतील इतर ब्रँडचा समावेश आहे. कंपनीने अद्याप हे फिचर केव्हा आणणार किंवा ब्रँडचा विस्तार कधी करणार आहे याची तारीख जाहीर केलेली नाही.

आणखीन एक नवीन फिचर लवकरच

अलीकडेच, ट्विटरने उघड केले की ते अजून एका नवीन फीचरची चाचणी घेत आहेत. यामध्ये वापरकर्त्याचे अकाऊंट लॉक किंवा निलंबित केले असल्यास त्याला सूचित केले जाईल. ट्विटर या नवीन नोटीस फिचरची चाचणी केली जात आहे यात जर आपण ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आपल्याला लॉक किंवा निलंबित केले आहे की नाही ते नोटीस पाठवून सांगितलं जाईल.

नवीन ट्विटर नोटिस फिचरमध्ये ज्यांचं अकाऊंट लॉक केलेले आहे किंवा निलंबित केले आहे अशा वापरकर्त्यांना अतिरिक्त माहिती आणि मार्गदर्शनही दिले जाणार आहे. जर आपले अकाऊंट कायमचे निलंबित झाले असेल तर आपण अपील सबमिट करू शकता आणि जर आपले अकाऊंट लॉक केलेले असेल तर आपण एका आठवड्यानंतर ते पुन्हा मिळवू शकता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Twitter may launch new shopping features for users ttg