scorecardresearch

ऑस्करसाठी दोन भारतीय चित्रपटांना नामांकन, पण नेमकी कशी असते ऑस्करची प्रक्रिया?

चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांना गौरवण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात.

Oscar
Oscar

दरवर्षी ज्युरी ऑस्कर पुरस्कारासाठी अनेक चित्रपटांची निवड करते. पुढील वर्षी २७ मार्च २०२२ रोजी ९४ वे अकादमी पुरस्कारा(Academy Awards)चे आयोजन करण्यात येणार आहे. दरवर्षी भारतीय चित्रपटातील अनेक चित्रपट ऑस्कर(Oscar)साठी नामांकित केले जातात. भारतातून ऑस्कर प्रवेशासाठी चित्रपट निवड प्रक्रिया सोमवारी कोलकत्ता येथे सुरू झाली. शाजी एन करण यांच्या अध्यक्षतेखाली फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या १५ सदस्यीय ज्यूरीने अकादमी पुरस्कारांमध्ये भारताच्या प्रवेशासाठी १४ चित्रपटांची निवड केली.

यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिचा ‘शेरनी’ (Sherni) आणि अभिनेता विक्की कौशल याचे ‘सरदार उधम’ (Sardar Udham) असे अनुक्रमे या चित्रपटांची पुढील वर्षीच्या ऑस्करसाठी निवड झाली आहे. या दोन्ही चित्रपटांची ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ‘फिचर फिल्म’ श्रेणीसाठी निवड झाली आहे.

ऑस्कर पुरस्कारची स्थापना

ऑस्कर पुरस्कार अर्थात अकॅडमी पुरस्कार आहे. हे अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स ॲंड सायन्स या चलचित्र अकादमीमार्फत दिले जाणारे वार्षिक पुरस्कार आहेत. चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांना गौरवण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. मेट्रो-गोल्डिन-मेयर स्टुडिओचे लुईस बी. मेयर यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स ॲंड सायन्स अकादमीची स्थापना केली, तसेच ऑस्कर पुरस्कारांचीही सुरुवात केली.

ऑस्करची निवडप्रक्रिया असते तरी कशी?

‘द अकॅडमी’चे जगभरात जवळपास ६३०० सदस्य आहेत. त्यात भारताचे ५०च्या आसपास सदस्य आहेत. यामध्ये अर्ध्याहून जास्त सदस्यांची मतं मिळाली म्हणजे सर्वोत्कृष्ट सिनेमाचा ऑस्कर पुरस्कार मिळतो. ही मतं मिळवण्याची प्रक्रियाही तितकीच रंजक असते. इथल्या प्रत्येक सदस्यापर्यंत आपला चित्रपट पोहोचवावा लागतो. त्यासाठी एक एजंट नेमावा लागतो. त्यानंतर चित्रपटाबरोबरच जागतिक मुल्य असावी लागतात. हा सर्व फिल्म मॅनेजमेन्ट तसेच चित्रपट व्यवस्थापनाचा भाग आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-10-2021 at 16:04 IST
ताज्या बातम्या