भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेह हा आजार आता सामान्य बनत चालला आहे. त्यामुळेच भारताला जगाची ‘मधुमेहाची राजधानी’ म्हटले जाते. आरोग्य तज्ञांचे मत आहे की मधुमेहाच्या एकूण रुग्णांपैकी ९० टक्क्यांहून अधिक रुग्ण हे टाइप २ मधुमेहाचे रुग्ण आहेत. टाइप २ मधुमेहामध्ये वयाला मोठे महत्व असते. जसजसे तुमचे वय वाढत जाते, तसतसे तुम्हाला टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता वाढते.

टाइप २ मधुमेहाची कारणे

टाइप २ मधुमेहाची अनेक कारणे आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे लठ्ठपणा म्हणजेच वाढलेले वजन. याशिवाय उच्च रक्तदाब, अवेळी खाणे, शारीरिक हालचालींपासून दूर राहणे आणि अनुवांशिक कारणांमुळेही टाइप २ मधुमेह होऊ शकतो. शरीरातील इन्सुलिनची कमतरता किंवा इन्सुलिन रेसिस्टन्स हेही एक प्रमुख कारण आहे. डॉक्टर सांगतात की असे अनेक रुग्ण आहेत जे वर्षानुवर्षे टाईप २ मधुमेह पीडित आहेत, परंतु त्यांना याबद्दल माहिती नाही. जर एखाद्याला रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित समस्या असतील तर त्याने मधुमेहाच्या लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

‘ही’ ५ लक्षणे दिसल्यास ताबडतोब सावध व्हा

जर तुम्हाला वारंवार भूक आणि तहान लागत असेल, तुम्हाला गरजेपेक्षा जास्त वेळा लघवी करावी लागत असेल, तुमच्या डोळ्यासमोर अचानक अंधार येत असेल तुमचे हात पाय बधीर होत असतील आणि अचानक थकवा जाणवत असेल, जखमा बऱ्या व्हायला खूप वेळ लागत असेल. ही टाइप २ मधुमेहाची लक्षणे असू शकतात.

कोणत्या वयात मधुमेहाचा धोका जास्त असतो?

http://www.webmd.com वर प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, ४५ वर्षांच्या वयानंतर टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो. अमेरिकेतील ४५ ते ६४ वयोगटातील लोकसंख्येपैकी १४% लोक टाइप २ मधुमेहाने ग्रस्त असल्याचे आढळले. ही संख्या १८ ते ४४ वयोगटातील लोकांपेक्षा सुमारे ५ पट जास्त आहे. वयानुसार मधुमेहाचा धोका वाढतो. अमेरिकेतील लोकसंख्येपैकी २५ टक्के लोक ज्यांचे वय ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक आहे त्यांना टाइप २ मधुमेहाचा त्रास असल्याचे आढळून आले आहे.

( हे ही वाचा: ‘या’ पदार्थांमुळे हाता- पायांच्या नसा फुगायला लागतात; वेळीच खाणे थांबवा)

टाइप २ मधुमेह वयाच्या ४ वर्षापासून होऊ शकतो

डॉ. जयंत पांडा, प्रोफेसर, मेडिसिन विभाग, SCB मेडिकल कॉलेज, कटक (ओडिशा), यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले की की टाइप १ मधुमेह लहानपणापासूनच सुरू होऊ शकतो. तर टाइप २ मधुमेह वयाच्या ४ वर्षापासून सुरू होऊ शकतो. ते असंही म्हणतात की आमच्याकडे मधुमेह असलेल्या बहुतेक मुलांचे वजन जास्त आहे. त्यामुळे शरीरातील इन्सुलिनच्या रेजिस्टेंसवर परिणाम होतो आणि मधुमेहाचा धोका वाढतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लहान मुलांमध्ये मधुमेहाची लक्षणे

डॉ. पांडा सांगतात की, तुमच्या मुलाला लठ्ठपणा किंवा वय आणि उंचीच्या प्रमाणापेक्षा जास्त वजन, वारंवार भूक लागणे, वागण्यात अचानक बदल होणे, थकवा जाणवणे अशा समस्या असल्यास लगेच मधुमेहाची तपासणी करून घ्यावी. लहान वयातच एखाद्या मुलास मधुमेह झाला तर पुढे इतर आजार होण्याचा धोकाही वाढतो.