Whatsapp वापरकर्त्यांना आता आयडी व्हेरिफिकेशन करावे लागेल? जाणून घ्या संपूर्ण तपशील

एका नवीन अहवालानुसार आता android फोन मध्ये whatsapp बीटा या नवीन वर्जनमध्ये अपडेट करण्यात येणार आहे.

lifestyle
अॅप वापरकर्त्यांना सेवेवर पेमेंट करण्यासाठी ओळख व्हेरिफिकेशन करण्याकरिता दस्तऐवज सबमिट करावे लागतील, किंवा करण्यास सांगू शकतात.(photo: indian express)

सोशल मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आता वापरकर्त्यांना येणार्‍या काही दिवसांमध्ये अपडेटमध्ये तुमची ओळख (आयडी) व्हेरिफाय करण्यास सांगू शकते. या व्हॉट्सअॅप अपडेटमध्ये कदाचित तुम्हाला कागदपत्रे सादर करावे लागतील. दरम्यान एका नवीन अहवालानुसार व्हॉट्सअॅपशी संबंधित हा नवीन अहवाल बीटामध्ये दाखवलेल्या नवीन स्ट्रिंगवर आधारित आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊयात.

व्हॉट्सअॅप ही सध्या जगातील सर्वात लोकप्रिय असलेला मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅप भारत व ब्राझीलमध्ये देखील अत्यंत लोकप्रिय आहे. यात चॅटिंग व्यतिरिक्त आता पेमेंट सर्विस देखील देण्यात आली आहे, जी या दोन्ही देशांमध्ये उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅप पेमेंट्स सर्विस वापरकर्त्यांना एकमेकांना थेट पैसे पाठवण्याची परवानगी देते. त्याचबरोबर एका नवीन अहवालानुसार आता android फोन मध्ये whatsapp बीटा या नवीन वर्जनमध्ये अपडेट करण्यात येणार आहे. ज्याने या अॅपवर पेमेंट वापरण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांची ओळख व्हेरिफाय करण्यास सांगण्यात येणार आहे.

XDA च्या अहवालात असे म्हटले आहे की Android वर्जन २.२१.२२.६ (नवीनतम बीटा आवृत्ती) साठी WhatsApp ने काही स्ट्रिंग जोडल्या आहेत. जे सूचित करतात की अॅप वापरकर्त्यांना सेवेवर पेमेंट करण्यासाठी ओळख व्हेरिफिकेशन करण्याकरिता दस्तऐवज सबमिट करावे लागतील, किंवा करण्यास सांगू शकतात.

दरम्यान कोणत्याही स्तरावर हे स्पष्ट झाले नाही की हे अपडेट विशिष्ट क्षेत्रासाठी लागू होतील की नाही कारण या संदर्भात WhatsApp कडून कोणतीही अधिकृत घोषणा किंवा विधान करण्यात आली नाहीये. ही गोष्ट अद्याप पाइपलाइनमध्ये आहे आणि ही पुढे जाऊन काढली जाऊ शकते. अहवालानुसार व्हॉट्सअॅप ब्राझीलमध्ये फेसबुकपे वापरून वापरकर्त्यांना त्यांचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड व्हेरिफाय करण्यास संगितले जाते.

दरम्यान, नवीन बीटा वर, ‘XDA’ ने वेगवेगळ्या शीर्षकांसह चार स्ट्रिंग्स स्पॉट करण्यात आले आहे. यामध्ये “तुमची ओळख सत्यापित करणे शक्य झाले नाही तर, कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्याचा प्रयत्न करा” आणि “WhatsApp वर पेमेंटची प्रोसेस सुरू ठेवण्यासाठी किंवा वापरण्यासाठी तुमची ओळख सत्यापित करा” असा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान मिळालेल्या अहवालानुसार, “WhatsApp सपोर्ट” नावाच्या दोन इतर स्ट्रिंग्स देखील होत्या, ज्या Android साठी WhatsApp च्या नवीन बीटा आवृत्तीवर दाखवण्यात आल्या होत्या.

अॅपमध्ये नवीन स्ट्रिंग जोडण्यामागील कारणाचा अंदाज लावणे हे खूप घाईचे होईल, परंतु अहवालनुसार सूचित करतात की व्हॉट्सअॅप पेमेंट सेवा दुसर्‍या क्षेत्रात आणण्याचा विचार करीत आहे. यासाठी भारतीय आणि ब्राझिलियन म्हणून कठोर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वापरकर्त्यांना सध्या त्यांची ओळख सत्यापित करण्याची आवश्यकता नाहीये किंवा व्यावसायिक कारणांसाठी त्यांना WhatsApp पेमेंटसाठी पडताळणी मर्यादित असू शकते. मात्र व्हॉट्सअॅपने अद्याप या बदलाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Whatsapp could ask users to verify their identity in a future update says a report by xda scsm

ताज्या बातम्या