आपल्यापैकी अनेकांना लिंबूपाणी आवडते. बरेच लोक आहेत जे सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी लिंबू पाणी पितात. वजन कमी करण्यासाठी आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी हे उत्कृष्ट पेय मानले जाते. काही लोक एकाचवेळी बाजारातून भरपूर लिंबू खरेदी करून आणतात. यात विशेषत: लिंबाचा भाव वाढल्याचे कळताच अगोदरच जास्त लिंब विकत घेतात. पण, तुम्ही कितीही महाग लिंबू विकत आणली तरी ती फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आठवडाभरही ताजी राहत नाहीत. त्याआधीच ते खराब होतात. यानंतर त्यातून विचित्र वास येऊ लागतो. यामुळे ती वापरण्यायोग्य राहत नाहीत. पण, ही समस्या सोडवण्यासाठी एका महिलेने एक भन्नाट सोपी ट्रीक शेअर केली आहे, ज्यातून तुम्ही फ्रीजमध्ये लिंबू महिनाभर ताजे ठेवू शकता.
फ्रीजमध्ये लिंबू महिनाभर राहतील ताजे, वापरा फक्त ‘ही’ ट्रीक
बाजारातून लिंबू आणून आपण फ्रीजमध्ये ठेवतो. पण, काही वेळातच या लिंबांची साल कोरडी आणि तपकिरी होते. यासोबतच त्याची चवही खूप कडू होते. पण, महिलेने सांगितलेल्या ट्रीकच्या मदतीने हे लिंबू महिनाभर फ्रीजमध्ये हिरवे राहतील. तसेच त्याची चव कडू लागणार नाही. यासाठी तुम्हाला लिंबू एका डब्यात पाणी भरून त्यात ठेवावे लागतील.
लिंबू महिनाभर राहतील ताजे
बाजारातून आणलेले लिंबू एका पाणी भरलेल्या कंटेनर ठेवा. आता त्यावर झाकण ठेवून परत फ्रीजमध्ये ठेवा. तुम्हाला दिसेल की, आता लिंबू महिनाभर हिरवे राहतील. याचा अर्थ असा की, आता हिरवे आणि रसाळ लिंबू तुमच्या फ्रीजमध्ये महिनाभर टिकतील. अनेकांना ही ट्रीक आवडली आहे.