महिलांच्या योनीमधून स्त्राव होणे ही अतिशय सामान्य मात्र तितकीच महत्त्वाची बाब आहे. हा स्त्राव आपली योनी स्वच्छ आणि संसर्गमुक्त ठेवण्यास मदत करतो. आयुर्वेदिक विशेषतज्ज्ञ डॉ. नितिका कोहली यांनी दिलेल्या माहितीनुसार, योनीतुन येणारा हा स्त्राव योनीमार्गाच्या उतींना निरोगी ठेवण्याचे काम करतो. तसेच, शारीरिक संबंधांच्यावेळी ते योनीला ल्युब्रिकेशन देते. मात्र योनीतुन मोठ्या प्रमाणावर स्त्राव होत असेल तर आपल्या आरोग्यास हानी पोहचू शकते. आज आपण योनीतुन येणारा स्त्राव आपल्या आरोग्याला कशाप्रकारे हानी पोहचवू शकतो हे जाणून घेऊया.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, योनीतुन येणाऱ्या स्त्रावाच्या रंगावरून आपण आपल्या आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊ शकतो. महिलांमध्ये योनीतील स्त्रावाचा रंग हा त्यांचे वय, मासिक पाळी आणि त्यांच्या आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असतो. योनीच्या मार्गातून होणाऱ्या स्त्रावाचा रंगात बदल जाणवत असल्यास त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण हा बदल तुम्हाला तुमच्या आरोग्यामधील बदल दर्शवत असतो. योनीतुन होणाऱ्या स्त्रावाच्या विशिष्ट रंगाचा अर्थ काय आहे हे आज आपण जाणून घेऊया.

  • घट्ट पांढऱ्या रंगाचा स्त्राव

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांमध्ये योनीच्या मार्गातून घट्ट आणि पांढरा स्त्राव होणे अतिशय सामान्य आहे. तथापि, हे यीस्ट संसर्गाचेही लक्षण असू शकते. जर तुम्हाच्या योनीला खाज आणि जळजळ होत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • पिवळ्या रंगाचा स्त्राव

जर तुमच्या योनीमधून पिवळ्या रंगाचा स्त्राव होत असेल तर तुम्ही सतर्क होणे गरजेचे आहे. अशा प्रकारचा स्त्राव बॅक्टेरियल इंफेक्शनचे कारण बनू शकते.

  • तपकिरी रंगाचा स्त्राव

जर तुमच्या योनीतून तपकिरी स्त्राव येत असेल तर यामागे अनियमित मासिक पाळी हे कारण असू शकते. तसेच, हे गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. त्यामुळेच तुम्हालाही हा त्रास जाणवत असेल तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

  • हिरव्या रंगाचा स्त्राव

जर तुम्हाच्या योनीतून हिरव्या रंगाचा स्त्राव होत असेल तर ते बॅक्टेरियाच्या संसर्गाचे किंवा लैंगिक संक्रमणाचे लक्षण असू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचबरोबर, आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, यीस्ट संसर्गाच्या लक्षणांमध्ये योनीला खाज सुटणे, लालसरपणा, जळजळ होणे, तसेच योनीमधून पांढऱ्या रंगाचा जाडसर स्त्राव येणे यांचा समावेश होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, योनीतून दुर्गंधी येत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.