World Physical Therapy Day 2021: जागतिक फिजिओथेरपी दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल जगभरातील फिजिओथेरपिस्टचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

lifestyle
८ सप्टेंबर रोजी जागतिक शारीरिक थेरपी दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. ( Photo : Freepik )

दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी जागतिक शारीरिक थेरपी दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. फिजिकल थेरपिस्टच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आणि लोकांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांच्याद्वारे केल्या गेलेल्या उपचारांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल जगभरातील फिजिओथेरपिस्टचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. फिजिओथेरपी किंवा फिजिकल थेरपी हे हालचाली आणि व्यायामाचे विशेषीकरण आहे. जे लोकांना वेदना, दुखापत, अन्य विशिष्ट समस्यांशी लढण्यास मदत करू शकते. फिजिओथेरपी हा सामान्यतः घरी केला जाऊ शकतो असा व्यायाम नाही. हे फिजिओथेरपिस्टच्या देखरेखीखाली करणे अत्यंत आवश्यक आहे. फिजिओथेरपी तुम्हाला व तुमच्या शरीराला मजबूत आणि अधिक लवचिक बनण्यास मदत करते.

इतिहास

जागतिक फिजिओथेरपी या दिवसाची स्थापना १९५१ मध्ये करण्यात आली. त्यानंतर हा दिवस ८ सप्टेंबर १९९६ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. तसेच हा दिवस जागतिक भौतिक चिकित्सा समुदायाची एकता दर्शवितो. या दिवशी फिजिओथेरपिस्टच्या कार्याबाबत जागरूकता वाढवण्याचा आणि आधार देण्याचा प्रयत्न केला जातो. या दिवशी या क्षेत्रातील लोकांना आणि त्यांच्या कामाला प्रोत्साहन देणे आणि त्यांचे कौशल्य वाढवणे यावर अधिक भर देण्यात आला.

फिजिओथेरपीचे काही फायदे

फिजिओथेरपी ही लोकांना दुखापतीतून बरे होण्यास, वेदना कमी करण्यास, भविष्यात होणारी दुखापत रोखण्यास किंवा एखाद्या दीर्घ शारीरिक समस्येशी किंवा अवस्थेस सामोरे जाण्यास मदत करते. जर तुम्हाला दुखापत झाली असेल किंवा तीव्र वेदना होत असेल तर शारीरिक उपचार वेदनांशी संबंधित मूलभूत समस्या सोडविण्यास फिजिओथेरपीची निवड करतात. हे केवळ वेदनामुक्ती देऊ शकत नाही, तर सतत सुरू असलेल्या समस्या टाळण्यासाठी दुरुस्त करण्यात मदत देखील करू शकते.

  •  हे तुम्हाला दुखापत टाळण्यास मदत करू शकते.
  •  वेदना कमी करण्यास मदत करते.
  •  स्ट्रोकमधून बरे होण्यास देखील मदत करू शकते.
  •  वयाशी संबंधित वैद्यकीय समस्या चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणण्यासमदत होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: World physiotherapy day learn history and significance scsm