Yoga For Back Pain : : हल्ली अगदी कमी वयातील लोकांपासून वृद्ध लोकांपर्यंत मानदुखी आणि पाठदुखीचा त्रास वाढलाय. सतत मोबाईल हाताळणे, टिव्हीसमोर बसणे, आठ-आठ तास लॅपटॉपसमोर बसून काम करणे यामुळे मानदुखी आणि पाठदुखीची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक उपाय करुनही अनेकदा काहीही फायदा होत नाही पण तुम्ही योगा करुन मानदुखी आणि पाठदुखीचा त्रास कमी करू शकता.
योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी दिवसभर बसून काम करणाऱ्या आणि ज्यांना मानदुखी आणि पाठदुखीचा त्रास आहे, अशा लोकांसाठी एक खास योगा सांगितला आहे.

या व्हिडीओमध्ये योग अभ्यासक मृणालिनी यांनी यासाठी मकरासन करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी मकरासन दोन पद्धतीने करण्यास सांगितले आहे. पहिल्या पद्धतीमध्ये सुरुवातीला पोटावर झोपावे आणि व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे हाताचे कोपर जमीनीवर ठेवून चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवावे. मकरासनच्या दुसऱ्या प्रकारामध्ये सुद्धा असेच करावे फक्त यात पाय मागे पुढे करावे.हा दोन्ही प्रकार फक्त दोन मिनिटे करावा. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला नीट समजून घेता येईल.

हेही वाचा :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन मृणालिनी यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्ही सुद्धा दिवसभर बसून काम करत असाल किंवा लॅपटॉपसमोर तासन् तास मान झुकवून बसत असाल आणि त्यामुळे मानदुखी व पाठदुखी सुरू झाली असेल, तर या मकरासनमध्ये या २ व्हेरीएशनचा तुमच्या रूटीनमध्ये समावेश करा.”
पुढे त्यांनी मकरासन केल्यानंतर कोणते फायदे मिळेल, हे सुद्धा लिहिलेय, “नियमित सरावाने तुमची मानदुखी कमी होईल.मणक्याचे आरोग्य सुधारेल. शरीराचं पोश्चर व्यवस्थित रहाण्यास मदत होईल . आणि शरीराला आराम मिळेल.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप उपयुक्त माहिती सांगितली.” तर एका युजरने विचारले, “पोट कमी करण्यासाठी एखादा उपाय सांगा” व्हिडीओवर अनेक युजर्सनी आभार व्यक्त केले आहे तर काही युजर्सनी आपल्या मनातील प्रश्न विचारलेली आहेत.