13 August 2020

News Flash

दि. ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१५

मेष : तुमची इच्छाशक्ती तीव्र असते. याचे फायदे आणि तोटे दोन्ही अनुभवायला मिळतील. व्यापार-उद्योगात एखादी स्वप्नमयी कल्पना तुमचे लक्ष आकर्षति करून तुम्हाला भारावून टाकेल.

| January 30, 2015 01:10 am

मेष तुमची इच्छाशक्ती तीव्र असते. याचे फायदे आणि तोटे दोन्ही अनुभवायला मिळतील. व्यापार-उद्योगात एखादी स्वप्नमयी कल्पना तुमचे लक्ष आकर्षति करून तुम्हाला भारावून टाकेल. पाठपुरावा करण्याच्या नादात दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. नोकरीमध्ये सहकाऱ्यांना आणि वरिष्ठांना तुमच्या कल्पना सांगू नका. घरामध्ये कामाच्या निमित्ताने प्रिय व्यक्तींपासून तुम्हाला लांब राहावे लागेल. तुमच्या उत्साही स्वभावाचा इतर सदस्यांना फायदा मिळेल. विद्यार्थ्यांनी मित्रांकडून मदतीची अपेक्षा ठेवू नये. 

वृषभ प्रगतीच्या दृष्टीने वातावरणाची चांगली साथ असल्यामुळे जी गोष्ट तुम्हाला मिळेल ती तुम्हाला कमीच वाटेल. अनेक विचार, अनेक योजना तुमचे लक्ष आकर्षति करतील. व्यवसाय-उद्योगात भागीदारी किंवा मत्रीकराराचे नवीन प्रस्ताव तुमच्यापुढे येतील. नोकरीमध्ये वरिष्ठ आणि सहकारी त्यांच्या एखाद्या मतलबाकरिता तुमची मदत घेतील, पण त्याचे श्रेय द्यायला तयार होणार नाहीत. घरामध्ये एखाद्या निमित्ताने नातेवाईक आणि आप्तेष्ट यांचा चेहरा आणि मुखवटा यांतील भेद तुमच्या लक्षात येईल.

मिथुन ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहात त्यांच्याकडून फारशी मदत न मिळाल्यामुळे तुमची थोडीशी निराशा होईल, परंतु अनपेक्षित मार्गाने साथ मिळाल्याने तुमचा जीव भांडय़ात पडेल. व्यापार-उद्योगात काही अनपेक्षित खर्च उपटतील. नोकरीमध्ये सहकारी तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही तुमचा ठरलेला मार्ग सोडू नका. तुमच्या नेहमीच्या कार्यक्षेत्रात काही तरी भव्यदिव्य करावेसे वाटेल. घरामध्ये इतरांना तुम्ही अनेक गोष्टी सुचवाल. त्यांच्यापुढे नवीन प्रस्ताव ठेवाल, पण त्याला प्रतिसाद मिळणार नाही.

कर्क प्रत्येक व्यक्तीचे मन जागृत असते. त्यांतून पुढे घडणाऱ्या घटनांची थोडी फार कल्पना येते. तशीच परिस्थिती या आठवडय़ात तुमचीही असणार आहे. पण स्वत:च्या मनाचा आवाज न ऐकता केवळ इतरांकरिता तुम्ही तडजोड करायला तयार व्हाल. व्यवसाय-उद्योगात कामाच्या वेळेला आपण एकटे आहोत याचा अनुभव येईल. कारखानदारांना नवीन कल्पना अमलात आणण्यापूर्वी कामगारांशी नीट चर्चा करावी. नोकरीमध्ये वरिष्ठ चुकीचे खापर तुमच्यावरच फोडतील. घरामध्ये तुम्ही शांत राहा.

सिंह एखाद्या गोष्टीच्या मागे तुम्ही लागलात की ती मिळाल्याशिवाय तुमच्या जिवाला चन पडत नाही. या आठवडय़ात याच कारणामुळे तुम्हाला व्यक्तिगत जीवनामध्ये थोडीशी कमतरता स्वीकारून बरेच काम करावे लागेल. व्यापार-उद्योगात ज्या व्यक्तींवर वेगळ्याच व्यक्तींकडून अनपेक्षित साथ मिळेल. नोकरीमध्ये एखाद्या कामानिमित्त घरापासून लांब राहावे लागेल. थोडेसे वाईट वाटेल, पण केलेल्या कामातून समाधान लाभेल. घरामध्ये सदस्यांची गरहजेरी तुम्हाला त्रासदायक वाटेल. इतरांशी जुळवून घेणे कठीण जाईल.

कन्या दोन वेगवेगळ्या आघाडय़ांवर वेगवेगळे अनुभव देणारे ग्रहमान आहे. तुमचा व्यवसाय, करियर या क्षेत्रात तुम्ही मोठय़ा उत्साहाने काम कराल. पण व्यक्तिगत जीवनात घडणाऱ्या एखाद्या प्रश्नामुळे तुम्ही थोडेसे संवेदनशील बनाल. व्यापार-उद्योगामध्ये पशाची आवक जरी चांगली असली तरी तुमच्या योजना मोठय़ा असल्यामुळे मिळणारे पसे कमीच वाटतील. नोकरीमध्ये तुमचे भविष्यातील बेत सहकाऱ्यांना कळू देऊ नका. घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा अर्थ तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे जास्त विचार करू नका.

तूळ ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे ’ हा कानमंत्र तुम्हाला उपयोगी पडेल. प्रयत्न करूनही ज्या कामाला गती येत नव्हती त्या कामामध्ये आता चिडून जाऊन एखादा धाडसी निर्णय घेऊ नका. व्यापारीवर्गाला एखादी जादा पसे मिळवून देणारी संधी दृष्टिक्षेपात येईल. नोकरीमध्ये बाहेरच्या कामाला महत्त्व देण्याऐवजी नियोजनाला जर महत्त्व दिले तर त्यातून बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतील. अधिकाराचा वापर विचारपूर्वक करा. घरामध्ये प्रश्न एक, पण प्रत्येकाची मते वेगवेगळी असल्यामुळे काहीच निष्कर्ष निघणार नाही.

वृश्चिक दोन वेगवेगळे अनुभव देणारे ग्रहमान आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही एकदम सक्रिय व्हाल, पण घरामधल्या प्रश्नामध्ये मात्र तुम्हाला मार्ग न मिळाल्यामुळे कोडय़ात पडल्या-सारखे वाटेल. व्यापारीवर्गाला आíथक प्राप्ती वाढविण्याकरिता काही नवीन कल्पना सुचतील. आíथक संस्था आणि तुमच्या ओळखी तुम्हाला उपयोगी पडतील. नोकरीमध्ये कामाच्या स्वरूपात बदल करून पाहिजे असेल तर त्याकरिता वरिष्ठांकडे शब्द टाका, पण घाई करू नका. एखाद्या व्यक्तीची अनुपस्थिती तुम्हाला जाणवेल.

धनू तुमच्या राशीचे वर्णन द्विस्वभावी रास असे केले जाते ते किती यथार्थ आहे हे दाखवून देणारा हा सप्ताह आहे. उलटसुलट विचार तुमच्या मनात येत राहतील. त्यामुळे नेमका एक निर्णय घेणे तुम्हाला जड जाईल. व्यापार-उद्योगात हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्याची घाई करू नका. नोकरीमध्ये सहकाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घ्या. नवीन नोकरीकरिता प्रयत्न करणाऱ्यांना एखादी चांगली संधी आकर्षति करेल. घरामध्ये त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल.

मकर सहसा तुम्ही कोणत्याही स्वप्नामध्ये रममाण होत नाही. पण या आठवडय़ात एखाद्या कल्पनेमध्ये रममाण होऊन स्वप्नमयी दुनियेत कधी जाल हे तुम्हालाही समजणार नाही. व्यापार-उद्योगात तुमच्या इच्छा-आकांशा वाढत राहतील. नोकरीमध्ये तुमच्यातील प्रावीण्याला आणि कौशल्याला वरिष्ठांकडून चांगली दाद मिळाल्यामुळे त्याच्या बदल्यात एखादी मागणी तुम्ही त्यांच्यापुढे ठेवाल. घरामध्ये समारंभाच्या निमित्ताने मित्रमंडळी आणि आप्तेष्टांचा थोडाफार सहवास मिळेल.

कुंभ कोणतेही काम करताना त्या कामाचे नियोजन आणि लहान-मोठे बारकावे या गोष्टींवर तुमचा भर असतो. पण या आठवडय़ात अनेक कामे एकाच वेळी हाताळायची असल्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या असा प्रकार होण्याची शक्यता आहे. व्यवसाय-उद्योगात तुम्ही करीत असलेले काम गती घेऊ लागेल. नोकरीमध्ये एखादी नवीन कल्पना तुमच्या डोक्यात घुसल्यामुळे तुम्ही त्याचाच पाठपुरावा करत बसाल. घरामध्ये एखादी जगावेगळी कल्पना तुम्ही इतरांसमोर ठेवाल. ती इतरांना पसंत पडली नाही तर त्याचा तुम्हाला राग येईल.

मीन व्यापार-उद्योगात एखादी स्वप्नमयी कल्पना तुमच्या मनात िपगा घालेल. ती कृतीत आणण्याकरिता तुमची घाई असेल. परंतु तेथे भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व असते हे लक्षात ठेवून दैनंदिनीवर लक्ष केंद्रित करा. नोकरीमध्ये सहकाऱ्याच्या नादी लागून तुमच्या कामाकडे दुर्लक्ष होणार नाही याकडे लक्ष ठेवा. एखादे काम मिळविण्याकरिता वरिष्ठांना बढाया माराल. घरामधल्या व्यक्तींनी कोणत्याही मागणीला विचारपूर्वक होकार कळवा.
विजय केळकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2015 1:10 am

Web Title: astrology 5
टॅग Astrology,Horoscope
Next Stories
1 दि. ९ ते १५ जानेवारी २०१५
2 दि. २ ते ८ जानेवारी २०१५
3 २६ डिसेंबर २०१४ ते १ जानेवारी २०१५
Just Now!
X