वेध : तुमचे करिअर आणि तुमचे भवितव्य

आजच्या काळात करिअरला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.

आजच्या काळात करिअरला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, करिअरमधल्या प्रगतीसाठी काय करावे याबाबत मार्गदर्शन करणारा लेख-

जीवनात करिअर ठरवताना किंवा उद्योगविषयक मार्गदर्शन करताना प्रयत्नवादी दृष्टिकोन हे ज्योतिषशास्त्राचे प्रथम कर्तव्य ठरते. त्या दृष्टीने विचार करता एका संस्कृत सुभाषितात म्हटलेच आहे की,

आस्ते भग आसीनस्य, उर्ध्व तिष्ठति तिष्ठत:

शेते निपद्यमानस्य, चराति चरतो भग:॥

अर्थ : जो माणूस उद्योगाविण बसून राहतो, त्याचे दैवही बसून राहते. तो उठून उभा राहिला की तेही उभे राहाते. तो झोपून राहिला तर तेही झोपून राहते आणि तो चालत राहिला, चार ठिकाणी फिरत राहिला, उद्योग करीत राहिला तर ते फळफळते.

जन्माला येताना माणूस प्रारब्ध नावाची गोष्ट घेऊन येतो आणि या प्रारब्धाच्या संपत्तीवर तो स्वत:चे कर्तृत्व गाजवत श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. कुणी श्रीमंत कुळात जन्माला येतो, कुणी मध्यम वर्गात येतो, तर कुणी गरीब घरातपण जन्माला येतो; परंतु कर्तृत्वाच्या दिशा सर्वाना सारख्याच उपलब्ध असतात. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून त्या समजून घेणे ही भूमिका महत्त्वाची. करिअरमधली यशस्विता ही केवळ जातकाच्या आवडीनिवडीवर अवलंबून नसून त्याच्या योग्य दिशेच्या प्रवासावरही अवलंबून आहे. त्यामुळेच असे म्हणता येईल की, योग्य दिशा अधिक आवड बरोबर यशस्वी करिअर. ही योग्य दिशा जातकाच्या प्राथमिक स्तरावर विचार करताना व्यक्तिमत्त्वाच्या विचारातून ठरवता येते.

जातक नोकरी करणार अथवा स्वतंत्र व्यवसाय करणार याचा विचार करताना कुंडलीत विविध गोष्टी पडताळून पाहाव्या लागतात. एखादे विशिष्ट स्थान आणि त्याची बलवत्ता पाहून निर्णय देणे चुकीचे ठरते. यासाठी जातकाच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करणे गरजेचे असते.

व्यक्तिमत्त्वाचा विचार करताना जातकाचे लग्न, लग्निबदूचे नक्षत्र, लग्न स्थानातील ग्रह, लग्नाची बलवत्ता, लग्नेशाची स्थिती प्रथम पाहावी लागते. लग्नातील रास कोणत्या तत्त्वाची आहे याचाही विचार करावा लागतो. लग्न ही प्रवृत्ती आहे, मूलभूत िपड आहे, तर रवी हा आत्मा आहे, प्रकृती आहे आणि चंद्र हे मन आहे, मनाला विविध प्रकारच्या जाणिवा होत असतात. रवी हा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो आणि ते टिकवण्याचा प्रयत्न करायला लावतो. चंद्र विविध भावना, जाणिवा उत्पन्न करून इच्छा निर्माण करतो. रवी आणि चंद्र हे दोघेही विविध प्रकारच्या इच्छा निर्माण करत असतात म्हणून त्यांचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो. रवी-चंद्राच्या राशी कोणत्या तत्त्वाच्या आहेत, हे ग्रह कोणत्या राशीत आहेत आणि कोणाबरोबर आहेत याचाही परिणाम व्यक्तिमत्त्वावर होतो. लग्न, रवी, चंद्र या तिघांबरोबर नवमांशीतील लग्न हेदेखील आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करत असते, कारण ते ग्रहांचे सूक्ष्म रूप आहे.

विशिष्ट रास, विशिष्ट तत्त्व ही नोकरीसाठी पूरक अथवा व्यवसायाला पूरक असे म्हणता येत नाही. परंतु प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधणे हे त्याला कोणते कार्य करायचे आहे अथवा जीवनातील घडणाऱ्या गोष्टींचा दृष्टिकोन ठरवताना महत्त्वाचे असते. अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल तत्त्वाची वैशिष्टय़े, राशींची वैशिष्टय़े विचारात घ्यावी लागतात.

व्यक्तिमत्त्वाचा विचार केल्यानंतर जन्म लग्न कुंडलीतील योग आणि दशा महत्त्वाच्या किंवा निर्णायक ठरतात.

ल्ल    नोकरीचे योग :

विशिष्ट क्षेत्रात नोकरी करण्यासाठी अथवा व्यवसाय करण्यासाठी त्या क्षेत्रातील शिक्षण, पदवी, ज्ञान असणे गरजेचे असते. उदा. बँकेत नोकरी करण्यासाठी विशिष्ट शिक्षण आवश्यक असते. तसेच व्यवसाय करण्यासाठी त्यातील शिक्षण गरजेचे असते. उदा. डॉक्टर, वकील, आíकटेक्ट इ.

’ कुंडलीतील शिक्षण स्थानांचा (१,५,९,४) अर्थ त्रिकोणाशी संबंध असेल अथवा अर्थ त्रिकोणाचे स्वामी, धनाच्या स्थानाचे स्वामी (२,५,८,११) यांचा शिक्षणाच्या स्थानाशी संबंध असेल तर जातक शिक्षण घेतो आणि त्याच्या माध्यमातून नोकरी मिळवतो अथवा अर्थार्जन करतो.

’ वरील स्थानांचा परस्परसंबंध हा योगाने आणि भाव संबंधपरत्वे आणि नक्षत्रपरत्वे पूरक होतो. उदा. पंचमेश षष्ठात, भाग्येश दशमात, षष्ठेश धनात इ. पंचमेश आणि षष्ठेश / पंचमेश आणि धनेश यांचा नवपंचम योग.

षष्ठेश पंचमेशाच्या नक्षत्रात, धनेश पंचमेशाच्या / भाग्येशाच्या नक्षत्रात इ.

’ शिक्षणाच्या भावांचा अर्थ त्रिकोणाशी संबंध असून लग्न स्थानाचा १/११/१२/६ या भावांशी संबंध असेल तर तो नोकरीला पूरक ठरतो. नोकरीत जातक कितीही शिकलेला असला, तो कितीही मोठय़ा हुद्दय़ावर असला, त्याला अधिकार असले तरी तो कोणाचा तरी नोकर असतो. त्याला त्याच्या मनाप्रमाणे वागता येत नाही. तसेच नोकरीत नियमांचे पालन करावे लागते.

’ षष्ठ स्थानावरून नोकरी, नोकरीचे स्वरूप, नोकरीतील अथवा उत्पन्नातील सातत्याचा विचार केला जातो, म्हणून षष्ठ स्थानातील प्रत्येक ग्रहाचा वरील गोष्टींवर परिणाम होत असतो. षष्ठ स्थानात असणारे ग्रह त्रिक स्थानाचे स्वामी असतील अथवा षष्ठापासून होणाऱ्या ६/८/१२ स्थानाचे स्वामी असतील अथवा षष्ठात केतू, नेपच्यून, हर्षल, प्लुटो यांसारखे पाप ग्रह किंवा विरुद्ध धर्माचे ग्रह असून षष्ठावर पापग्रहांची दृष्टी असेल तर जातकाला नोकरी मिळण्यात त्रास, अडथळे अथवा नोकरी टिकवून ठेवण्यात अडचणी येतात.

’ कालपुरुषाच्या कुंडलीत लग्न स्थानात मेष रास पडते, षष्ठात कन्या, दशमात आणि लाभात क्रमाने मकर व कुंभ राशी पडतात. विशिष्ट फलित बघताना कारक भावांचे, त्यांच्या भावेशांचे योग ज्याप्रमाणे पाहिले जातात त्याचप्रमाणे कारक ग्रहांचे परस्परांशी होणारे योगदेखील नोकरी / व्यवसाय ठरविताना महत्त्वाचे होतात. उदा. बुध-शनी परस्पर दृष्टी योग संबंध नोकरी करायला लावतो. मंगळ-बुध संबंध इ. बुध व गुरू हे बुद्धिजीवी ग्रह आहेत.

’ नोकरीतील अधिकार, मान, सत्ता बघताना दशम स्थानाची आणि लाभ स्थानाची बलवत्ता असणे गरजेचे असते. दशमावरून सामाजिक दर्जा, सत्ता यांचा विचार होतो. दशमेश दशमात, षष्ठेश दशमात, लग्नेश दशमात, लाभेश / धनेश / भाग्येश दशमात पूरक होतात. तसेच नोकरीचे कारक ग्रह लग्नेश / भाग्येश / दशमेशाच्या नक्षत्रात असता बलवान होतात. तसेच षष्ठ, दशम, लग्न स्थानातील रवी, मंगळ, राहू जातकाला अधिकाराच्या इच्छा उत्पन्न करतो.

’ रवी हा अस्तित्वाचा, अधिकाराचा, मानसन्मानाचा कारक ग्रह आहे. म्हणून नोकरीतील अधिकार, करिअरमधील प्रगती पाहताना रवी कुंडलीचा विचार करावा लागतो. रवीच्या धन / लाभातील ग्रह करिअरमधील पसा, आíथक उत्कर्ष दाखवितात. रवी कुंडलीत ३, ६, ९, १० या स्थानांची बलवत्ता असता, परस्परसंबंध असता जातकाला पुढे जाण्याच्या, प्रगती करण्याच्या इच्छा असतात. सिंह राशीच्या धनात कन्या व लाभात मिथुन रास पडते म्हणून पसा मिळवण्यासाठी रवी-बुधाचे योग विचारात घेतले जातात. सिंह राशीच्या षष्ठात मकर व सप्तमात कुंभ रास पडते, म्हणून शनी हा रवीसाठी अडसर निर्माण करतो. (षष्ठावर शत्रू, चिंता आणि सप्तमावरून प्रतिस्पर्धी पाहिला जातो.) म्हणून करिअरमधली प्रगती बघताना रवी-शनीचे कुंडलीतील योग पाहणे गरजेचे असते. तसेच करिअरमधील प्रगती आपल्याला मिळणाऱ्या वरिष्ठांवर अवलंबून असते आणि आपले वरिष्ठ पाहताना रवीची स्थिती, दशमाची स्थिती तपासणे गरजेचे असते. पंचमहापुरुष योग, राजयोग हेदेखील अधिकाराला, स्वतंत्र व्यवसायाला पूरक ठरतात.

’ नवम स्थान हे दैव स्थान आहे. हे जातकाचे भाग्य आहे. कर्मावर आपला अधिकार असतो, परंतु त्याच्या फलितावर नाही. जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळवण्यासाठी, कर्माला योग्य तो प्रतिसाद मिळण्यासाठी दैवाची साथ लागते. तसेच नोकरीतील यश मिळवण्यासाठी, पुढे जाण्यासाठी, आíथक लाभ मिळवण्यासाठी षष्ठाच्या भाग्याची म्हणजे धन स्थानाची साथ लाभणे गरजेचे असते. कुंडलीत या दोन्ही म्हणजे नवम आणि धन स्थानाची बलवत्ता कमी असेत तर जातकाची नोकरीत अपेक्षित प्रगती होत नाही अथवा कष्ट करून, काम करून त्याचे चीज होत नाही.

नोकरीत निलंबन अथवा होणारे आरोप अथवा त्रासाचा विचार करताना पुढील गोष्टी विचारात घ्याव्यात.

’ द्वादश स्थानावरून निलंबन, बदनामी व जाचक आरोप अथवा योग पाहिले जातात. म्हणून द्वादश भाव आणि व्ययेश पाहावे लागतात.

’ लग्न स्थान आणि लग्नेशावरून वरील गोष्टींसाठी जातक स्वत: जबाबदार असतो. लग्न स्थानातील ग्रह, लग्नेशाची स्थिती म्हणजे दूषित असल्यास जातक जबाबदार असतो.

’ दशम स्थान, दशमेश दूषित असल्यास ऑफिसमधील वातावरण, वरिष्ठ यांच्यामुळे त्रास होतो.

’ षष्ठाचे षष्ठ / लाभ स्थान आणि षष्ठाचे लाभ स्थान दूषित असेल तर, सहकारी वर्ग अथवा निर्णयाच्या चुकीचा त्रास होतो.

’ नोकरीतील त्रास अथवा निलंबनाचा विचार करताना प्रथम जन्म लग्न कुंडलीत पूरक योग असावे लागतात आणि हे योग फलद्रूूप करण्यासाठी दशा-अंतर्दशा आणि गोचर ग्रह महत्त्वाचे ठरतात. गोचर ग्रहांचा विचार करताना सर्वात महत्त्वाचा शनी होतो. गोचरीने शनीवरील कारक भावेशांशी केंद्र योग करत असेल, दृष्टी टाकत असेल तर ती गोष्ट उघडकीस आणतो. फसवणुकीचा विचार करताना नेपच्यून व केतू हेदेखील पूरक होतात. नेपच्यून गूढ, फसवा ग्रह आहे. छुप्या गोष्टी म्हणजे वरकरणी लवकर लक्षात न येणाऱ्या गोष्टी नेपच्यूनवरून पाहिल्या जातात. म्हणून षष्ठात, व्ययात, दशमात नेपच्यून अथवा त्यांच्या भावेशांच्या बरोबरचा नेपच्यून त्रास देतो. केतू हा किंतु निर्माण करणारा आणि फलितात तडजोड करायला लावणारा, कमीपणा देणारा आहे, म्हणून षष्ठात, दशमात, व्ययात केतू, त्यांच्या स्वामींबरोबर असणारा केतू त्रास देतो. तसेच गोचरीने नेपच्यून, केतू जेव्हा या भावांतून जातात अथवा त्यांच्या भावेषांशी अंशात्म योग करतात, तेव्हा त्रास, फसवणूक होते.

’ जन्म लग्न कुंडलीत नोकरीत त्रासाचे योग बघताना जन्मस्थ कुंडलीचा दर्जा महत्त्वाचा ठरतो व गोचरीच्या ग्रहांच्या जन्मस्थ ग्रहांच्या अशुभ संबंधाने हे योग थोडय़ा कालावधीसाठी येऊ शकतात. गोचर शनीचा जन्मस्थ षष्ठेश, दशमेश, व्ययेश, लग्नेश, भाग्येश यांच्याशी अशुभ योग करतो तेव्हा त्रासाचा काळ असतो, अशा वेळी शनीचा जन्मस्थ चंद्राशीदेखील अशुभ योग होत असेल तेव्हा परिस्थितीचा परिणाम जातकाच्या मनावर होतो. रवी हा सत्ता, अधिकाराचा, वरिष्ठांचा कारक आहे. जन्म लग्न कुंडलीत रवी शत्रू राशीत, नीचीचा अथवा ग्रहण योगात अथवा शनीच्या संबंधात असेल तर तो रवी दूषित होतो. अशा लोकांनादेखील नोकरीत योग्यतेप्रमाणे अधिकार मिळत नाही आणि वरिष्ठांकडून त्रास होत असतो किंवा डावलले जाते. गोचरीच्या शनीचे जन्मस्थ रवीवरून भ्रमण अथवा दृष्टी, केंद्र योग, षडाष्टक योग चालू असेल तर नोकरीत त्रासाचा काळ चालू असतो. प्रत्यक्ष निलंबनाच्या कार्यात गोचर मंगळ महत्त्वाचा होतो. गोचर मंगळाचे व्यय, भाग्य, अष्टमातून, द्वितीयातून, पंचमातून भ्रमण होत असेल आणि मंगळाचा जन्मस्थ दशमेश, षष्ठेश, व्ययेश, भाग्येश यांच्याशी अशुभ संबंध असेल तर तो काळ त्रासाचा होतो.

ल्ल    नोकरी केव्हा लागेल :

’ गोचरीच्या गुरूचे दशम अथवा षष्ठातून भ्रमण होत असेल आणि गुरूचा लग्नेश, षष्ठेश अथवा दशमेशाशी शुभ संबंध असेल.

’ दशमेशाला अथवा षष्ठेशाला तात्कालिक बळ असेल म्हणजे या भावेशांची भावावर पूर्ण दृष्टी किंवा त्या भावातून भ्रमण.

’ षष्ठाचे भाग्य म्हणजे द्वितीय स्थान अथवा द्वितीयेश दूषित असेल अथवा त्यांचे बल कमी असेल तर जातकाला नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात अथवा कोणती तरी तडजोड करावी लागते.

’ जन्मस्थ भाग्येश, षष्ठाचा भाग्येश आणि लग्नेश हे नकारात्मक स्थितीत असतील तर जातकाला नोकरीत, नोकरी मिळवताना, त्यात प्रगती करताना त्रास होतो.

’ जन्मस्थ षष्ठेश दूषित असता बलहीन असेल आणि षष्ठ स्थानदेखील पापग्रहांच्या अशुभ संबंधात असेल अथवा षष्ठेश पंचमात किंवा षष्ठापासून सहाव्या / आठव्या स्थानात नकारात्मक स्थितीत असेल तर जातकांना नोकरी मिळवताना, बदल होताना अथवा ती टिकवताना त्रास होतो.

’ ५ / १ / ३ / ६ / १० / ११ / १२ / २ / ७ या स्थानातील ग्रहांच्या दशा अथवा त्यांच्या पूरक स्थितीत असणाऱ्या दशा-अंतर्दशा चालू असताना नोकरी मिळवण्यासाठी काळाची अनुकूलता असते.

 

ल्ल    नोकरीत बदली :

’ नोकरीत बदलीचा विचार करताना एकाची बदली ही त्याच ऑफिसात अथवा गावात होते. फक्त टेबल बदलते तर दुसऱ्याची दुसऱ्या ठिकाणी होते. कधी कधी घरापासून, कुटुंबापासून लांब जावे लागते.

’ बदली घडवण्यात महत्त्वाचे ठरतात शनी, मंगळ, राहू.

’ मनासारख्या बदलीत गोचर गुरूचा कारक भावेशाशी व लग्नेशाशी होणारा शुभ संबंध महत्त्वाचा ठरतो.

’ दशा आणि गोचर कारक ग्रहांचा विचार करता तृतीय आणि अष्टम स्थानावरून जवळची बदली  तर नवम आणि द्वितीय स्थानावरून लांबची बदली पाहिली जाते.

’ गोचर शनीचा वरीलपकी ज्या भावेशांची संबंध असेल अथवा त्या भावातून भ्रमण असेल आणि गोचर शनीचा चतुर्थ अथवा सप्तम भावाशी किंवा त्यांच्या स्वामींशी अशुभ योग असेल तर लांबची बदली होते किंवा घरापासून, जोडीदारापासून लांब जावे लागते. अशा योगात जन्मस्थ सप्तमेश हा विरहाचे योग दाखवत असतो.

 

ल्ल    नोकरीत प्रमोशन :

’ प्रमोशनचा विचार करताना दशम, लाभ, द्वितीय आणि लग्न भाव, नवम आणि त्यांच्या स्वामींची गोचरीने स्थिती महत्त्वाची होते.

’ प्रमोशन होते तेव्हा कामात बदल होतो, अधिकार वाढतात आणि त्यायोगे आíथक उत्कर्षदेखील होत असतो, म्हणून दशम स्थान, दशमेश, रवी आणि गुरू महत्त्वाचे होतात.

’ आíथक लाभ वाढणार असतील तर गोचर गुरूचा धन / लाभाशी शुभ संबंध यायला हवा.

ल्ल    व्यवसाय योग :

’ व्यवसायाचा विचार करताना जातकाचे व्यक्तिमत्त्व हे थोडे वेगळे असावे लागते. नोकरीत कितीही मोठे अधिकार असले, पसा असला तरी नोकरीत जातक कोणाचा तरी नोकर असतो. त्याला दुसऱ्याचे, संस्थेचे ऐकावे लागते, नियम पाळावे लागतात, तर व्यवसायात जातक स्वतंत्र असतो, त्याचे स्वत:चे विचार / मते निर्णायक असतात. व्यवसायात अनेक स्वरूपाची अनिश्चितता असते आणि ही अनिश्चितता स्वीकारण्याची मनाची तयारी असावी लागते.

’ वरील सर्व गोष्टींचा विचार करता कुंडलीतील लग्न स्थान, उपचय स्थाने ( ३ / ६ / १० / ११) आणि नवम स्थान, हे भाव महत्त्वाचे होतात. उपचय स्थानांची बलवत्ता असेल तर जातकाची परिस्थिती भेदण्याची, आव्हाने स्वीकारण्याची आणि ती पेलवण्याची क्षमता असते. ३ / ११ ही नाशक स्थाने आहेत म्हणजे एक षष्ठाचे षष्ठ आणि एक अष्टमाचे अष्टम. तृतीय स्थान पराक्रम, कर्तृत्व, सहज प्रवृत्ती आहे. एकादश स्थान दशमाचे धन स्थान आहे. जीवनातील लाभ आहेत. तसेच ३ व ११ ही स्थाने उद्योग त्रिकोणातील स्थाने आहेत. उद्योग त्रिकोण हा इच्छादर्शक असतो. षष्ठ स्थानावरून दशमाचे भाग्य, हाताखालची माणसे, आपले शत्रू, व्यवसायातील भागीदाराचे नुकसान आणि जीवनात घ्यावे लागणारे कर्ज, या सर्व गोष्टी व्यवसायात महत्त्वाच्या होतात. दशम स्थानावरून व्यवसाय, त्याचे स्वरूप, व्यवसायातील उत्पन्नाचे प्रमाण पाहिले जाते. तसेच दशमावरून सामाजिक दर्जा ठरतो. लग्न स्थानावरून जातकाची महत्त्वाकांक्षा ठरते, जीवनाचा उद्देश ठरतो, तर नवम स्थानावरून दैवाची साथ पाहिली जाते. म्हणून व्यवसाय करण्यासाठी १ / ३ / ६ / ९ / १० / ११ या भावांची अनुकूलता म्हणजे बलवत्ता, या भावांचा परस्परसंबंध आणि १ / ३ / ६ / १० / ११ या भावातील ग्रहांच्या अथवा पूरक स्थितीतील बलवान भावेषांच्या दशा-अंतर्दशादेखील पूरक होतात.

’ व्यवसाय करण्यासाठी वर विचार केलेली स्थिती अनुकूल असेल तर जातकाला स्वतंत्र व्यवसायाच्या इच्छा होतात, परंतु व्यवसायातून खरा आíथक लाभ मिळणार आहे का – याचा विचार करावा लागतो. यासाठी दशम स्थानाबरोबर धन किंवा लाभ या स्थानांची बलवत्ता, शुभ स्थिती अथवा परस्परसंबंध असावा लागतो. षष्ठाचा धन स्थानाशी म्हणजे २ / ५ / ८ / ११ या भावांशी संबंध असेल अथवा लग्नाचा षष्ठाशी परस्परसंबंध असेल तर जातक नोकरीस प्राधान्य देतो.

’ दशमाचे व्यय म्हणजे नवम आणि जातकाचे व्यय म्हणजे द्वादश हे दोन्ही भाव आणि त्यांचे स्वामी दूषित असतील, या भावांची बलवत्ता / शुभत्व नसेल तर जातकाचे व्यवसायात नुकसान होते.

’ नुकसानीचा विचार करता शनी, राहू-केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो, मंगळ हे ग्रह महत्त्वाचे होतात.

’ व्यवसायात भागीदारी करावी लागणार असेल तर दशम लग्न, द्वितीय अथवा लाभाचा सप्तमाशी परस्परसंबंध असावा लागतो. सप्तमावरून भागीदारी, भागीदारीचे स्वरूप पाहिले जाते, तर भागीदारी टिकविण्यासाठी सप्तमेश महत्त्वाचा होतो. सप्तमाचा षष्ठ / व्ययाशी संबंध असेल, सप्तमेश बलहीन असेल अथवा सप्तमेश / सप्तम स्थान राहू-केतू, हर्षल, नेपच्यून, मंगळ यांच्या संबंधात असेल तर भागीदारी टिकत नाही. लग्नेश सप्तमात, सप्तमेश सप्तमात असेल, सप्तमात रवी, मंगळ असतील तर व्यवसायातील भागीदार हा जास्त वरचढ होतो. ज्यांचा सप्तमेश / सप्तम स्थान नकारात्मक स्थितीत आहेत आणि लग्न स्थानाची बलवत्ता कमी पडत असेल तर अशा लोकांनी भागीदारी ही थोडय़ा कालावधीसाठी म्हणजे प्रकल्पानुसार करावी किंवा गोचर गुरूच्या शुभ संबंधाच्या काळात करावी.

व्यवसायाचे स्वरूप ठरविताना राशींच्या आणि ग्रहांच्या कारकत्वांचा विचार केला जातो. लग्न आणि दशम स्थानातील रास ही एकाच तत्त्वाची असते, (चर, स्थिर, द्विस्वभाव) लग्न आणि दशम स्थानातील राशी तत्त्वाला तृतीय आणि लाभ स्थानातील राशी पूरक ठरत असतात.

चर – कृतिप्रिय, व्यावहारिक, जडउद्देशी, निर्णयक्षम, केंद्रापसारी, मल्टिटास्किंग.

स्थिर – संथ, संयमी, धोरणी, विचारी, आपल्या मतावर ठाम राहणारे, बदल लवकर न स्वीकारणारे, केंद्रावर्ती आहे, ठरवलेले काम सातत्याने पूर्ण करणे.

द्विस्वभाव – चंचल, संदिग्ध, विचार आणि वास्तवाचा घोळ, चर आणि स्थिर दोन्ही गुणांचा अंतर्भाव म्हणून मल्टिटास्किंग तेवढेच निश्चयी अथवा धरसोड वृत्ती, अनेक गोष्टी करण्याचा कल.

वडिलोपार्जति व्यवसायाचा संबंध असल्यास दशमाचा आणि द्वितीय, षष्ठ, नवमाचा परस्परसंबंध आढळून येतो.

दशम स्थानात पडलेला ग्रह कोणत्या भावाचा स्वामी आहे याचा विचार केल्यास जातकाच्या कर्माला / व्यवसायाला विशिष्ट भाव जोडला जातो. उदा. पंचमेश दशमात – शिक्षण, कला गुणाचा व्यवसायाशी संबंध, संमतीचा संबंध, उत्पादनाचा संबंध.

दशमातील प्रत्येक ग्रह कारकत्वाने आणि भावेशाने परिणाम करत असतो. लग्निबदू बरोबरीने, दशम भावाची बलवत्ता असणे, दशमात ग्रह असणे गरजेचे असते. नियतीने कर्मालाच स्वायत्तता दिलेली आहे, म्हणून दशमात ग्रह असणे गरजेचे असते. तसेच दशमेश शुभ स्थितीत असणे गरजेचे असते. तसेच दशमेश शुभ स्थितीत अथवा बलवान असल्याशिवाय व्यवसायात पुढे जाता येत नाही, यश मिळवता येत नाही.

व्यवसाय अथवा व्यवसायाचे स्वरूप ठरविताना दशमेश कोणत्या भावात आहे याचा विचार महत्त्वाचा होतो.

दशमेश लग्नात – या व्यक्ती अत्यंत हुशार, धूर्त असतात. त्यांना काय हवे आहे हे ठरलेले असते आणि त्यासाठी प्रयत्न करत असतात. स्वत:च्या अधिकाराचा वापर करता येईल अशा व्यवसायाची निवड करतात.

दशमेश द्वितीयात – वडिलोपार्जति व्यवसाय, व्यवसायातून आíथक लाभ, पशाचा रोकडा व्यवहार धंदा (कॅश काऊंटर), दुकानदारी, खाण्याचा व्यवसाय.

दशमेश तृतीयात – दशमेश शुभ ग्रह असून तृतीयात असेल तर व्यवसायात जास्त कष्ट घ्यावे लागतात. एकाच वेळी २/३ गोष्टी अथवा फिरतीच्या व्यवसायाचा, कमिशनच्या व्यवसायाचा संबंध येतो.

दशमेश चतुर्थात – व्यवसायाचे प्रमुख स्थान घर असते अथवा घरातून व्यवसाय केला जातो. जमीन, शिक्षण, स्थावर अथवा व्यवसायाभिमुख शिक्षण घेऊन त्यावर छोटासा उद्योग, शेती, कुक्कुटपालन इत्यादी.

दशमेश पंचमात – बुद्धीशी निगडित म्हणून शिक्षण, कला-गुण, खेळाशी निगडित व्यवसाय, टीचिंग, प्रॉडक्शन, कन्सल्टन्सी दलाली, वायदा बाजार.

दशमेश षष्ठात – वडिलोपार्जति व्यवसाय अथवा व्यवसायात दुय्यम दर्जा, व्यवसायात कष्ट घ्यावे लागतात, कर्ज काढावे लागते, दुकानदाराशी अथवा सव्‍‌र्हिस प्रोव्हायडेड बिझनेस, शेतीला पूरक व्यवसाय, प्राणी, जमीन, औषधेसंबंधित व्यवसाय.

दशमेश सप्तमात – दशमेश दशमाच्या दशमात, म्हणून व्यवसायात यश, व्यवसायात / यशात जोडीदाराचा सहभाग असतो, व्यवसायाचे स्वरूप व्यापक असते, जाहिरात क्षेत्र, परदेश व्यापार, प्रॉडक्शन, ज्या क्षेत्रात नाव / प्रसिद्धी जास्त आहे.

दशमेश अष्टमात – दशमेश अष्टमात असता व्यवसायात लवकर स्थिरता येत नाही. कष्ट / प्रयत्न वाढवावे लागतात. इम्पोर्ट, एक्सपोर्ट, कमिशन, दलाली अथवा व्यवहारातून पसा. (वकील, डॉक्टर, सीए)

दशमेश नवमात – दशमेश नवमात असता, दशमेशाची स्थिती, नवमाची स्थिती महत्त्वाची ठरते. दशमेश नवमात शुभ स्थितीत असता हा चांगला योग होतो. धार्मिक क्षेत्र, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था यांच्याशी संबंध येतो. वडिलोपार्जति व्यवसाय, परदेशात अर्थार्जनाचा संबंध येतो. नवमेश आणि दशमेश दूषित असेल तर  व्यवसायात नुकसान होते.

दशमेश दशमात – व्यवसायात यशस्वी होतात, समाजात मान्यता असते. दशमेश दशमात दुर्बल असता व्यवसायात वडील अथवा वरिष्ठांची मदत घ्यावी लागते. कन्सल्टन्सी, वडिलोपार्जति व्यवसायाचा, व्यवसाय अथवा स्थिर व्यवसायाचा संबंध येतो, व्यवसायाचा व्याप मोठा असतो.

दशमेश लाभात –  व्यवसायात उत्तम लाभ देतो, व्यवसायाचे स्वरूप व्यापक असते. व्यवसायात मित्रवर्ग, सहकारी, वडीलबंधू अथवा वडिलांचे सहकार्य मिळते.

दशमेश व्ययात – दशमेश व्ययात, व्यवसाय अथवा अर्थार्जनासाठी दूर जावे लागते. व्यवसायात लवकर स्थिरता येत नाही, प्रवास करावे लागतात, दशमेश दूषित असता व्यवसायात नुकसान सहन करावे लागते. सरकारी क्षेत्र, हॉस्पिटल, परदेश, प्रोफेशन, काळा बाजार, चोरटा व्यापार यासाठी पूरक होतो.

ल्ल    व्यवसायांचे वर्गीकरण

बौद्धिक व्यवसाय- गणित, शास्त्रज्ञ, तत्त्ववक्ते, डॉक्टर, वकील, सीए, ज्योतिषी, आíकटेक्ट. (१, १०, ५, ९, ११)

अर्थकारणविषयक व्यवसाय – बँक, इन्शुरन्स, सीए, सीएस, फायनान्स – मोठे उद्योगपती, मिलमालक, कमिशन. (२, ६, १०, ५, ८)

कला, खेळ, कल्पनाशक्ती यांच्याशी निगडित व्यवसाय – अभिनय, सिनेमा, विविध कला, ग्लॅमर, वाद्य, काऊन्सेलिंग. (३, १, ५, ७, १०)

सव्‍‌र्हिस प्रोव्हायडेड व्यवसाय – हॉटेल, कुरियर, गॅरेज इ. म्हणजे सेवा असणारे व्यवसाय.  (६, ८, १२)

प्रॉडक्शन अथवा  मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय –  कारखानदारी, जिथे कच्चा माल घेऊन उत्पादन केले जाते, मिल, छापखाने. (५, ७, २, ८)

स्थिर व्यापार अथवा दुकानदारी – विविध प्रकारचे दुकानदार. (१०, १, २, ११)

फिरते व्यवसाय – फेरीवाले, घरोघरी अथवा विशिष्ट संस्थेशी निगडित, जाऊन विक्री करणारे. (३, ६, ८, १२)

व्यवसायातील यश अथवा त्रास / सहजता बघताना जन्म लग्न कुंडलीतील दशम स्थान व दशमेशाची बलवत्ता ज्याप्रमाणे बघितली जाते, त्याचप्रमाणे जन्मस्थ दशमेश व जन्मस्थ लग्नेश नवमांशात कोणत्या नवमांशी आणि कोणत्या स्थानात आहे हे तपासावे लागते. म्हणजे जन्मस्थ लग्नेश व दशमेश नवमांशात ६ / ८ व्या नवमांशी असेल, नीच / शत्रू नवमांशी असेल अथवा नवमांशात त्रिक स्थानात असेल तर व्यवसायात त्रास सहन करावा लागतो.

वरील नियमाप्रमाणे व्यवसायातील अथवा नोकरीतील यश पाहताना कुंडलीत गुरू-शनीचे होणारे योग, शनी-मंगळाचे होणारे योग विचारात घ्यावे लागतात. कालपुरुषाच्या कुंडलीनुसार दशम आणि दशमाच्या धन स्थानाचा स्वामी शनी आहे म्हणजे कर्मासाठी आणि कर्माच्या माध्यमातून मिळणाऱ्या अर्थप्राप्तीसाठी शनी महत्त्वाचा होतो. दशमाच्या व्यय स्थानाचा, भाग्य स्थानाचा आणि जातकाच्या होणाऱ्या शारीरिक, मानसिक, आíथक नुकसानीचा कारक ग्रह होतो गुरू. म्हणून जीवनातील यशासाठी, कष्टांचे चीज होण्यासाठी गुरू-शनीचे शुभ योग, त्यांची बलवत्ता गरजेची असते.

जन्म लग्न कुंडलीत नसल्यास नवमांशात शुभ योग असणे गरजेचे असते. मंगळ हा महत्त्वाकांक्षा, जिद्द, आशावाद, सामथ्र्य, कृती यांचा कारक आहे. लग्न स्थानाचा स्वामी मंगळ होतो, तसेच जीवनातील अडथळे, कष्ट, संकटे, दु:ख अथवा चुकीच्या गोष्टी करण्यासाठी लागणारे सामथ्र्यही मंगळ देतो. म्हणून कुंडलीत शनी-मंगळाचे योग, गुरू-मंगळाचे योग तपासणे गरजेचे असते.

कुंडलीत रवी-मंगळ, रवी-गुरू, मंगळ-गुरू यांचे शुभ योग असता करिअरमधील अधिकार, मान, यश मिळवण्यासाठी पूरक होतात.

व्यवसाय करताना, व्यवसायातील गुंतवणूक करताना जातकाची चालू असलेली महादशा आणि पुढच्या नजीकच्या काळातील (काही वर्षांतील अंतर्दशा) विचारात घेणे गरजेचे असते. तसेच पुढील ४/५ वर्षांतील गोचर गुरू / शनीची भ्रमणे आणि त्यांचे इतर ग्रहांशी होणारे शुभाशुभ योग विचारात घ्यावे लागतात. गुरू, शनीची बलवत्ता अष्टक वर्गाच्या माध्यमातूनदेखील तपासावी लागते. जातकाच्या जीवनातील महादशा बदलल्या की दशा निर्णायक होतात, म्हणजे जीवनातील बदलाला कारणीभूत होतात. आता आपण यासंदर्भातील उदाहरण पाहूया.

उदाहरण

जातक पुरुष : जन्म दिनांक १०-०८-१९६४ जन्म वेळ : ०७.५० जन्म ठिकाण : पुणे

विशेषत्व – बँक व्यवसायातील उच्च पदाधिकारी.

१. जातकाचे सिंह लग्न, सिंह रास, लग्न िबदू दशमेश शुक्राच्या पू. फाल्गुनी नक्षत्रात – लग्न बलवान – अधिकाराला पूरक. ( शुक्र – तृतीयेशदेखील आहे.)

लग्न स्थानात बुध, चंद्र, प्लुटो, हर्षल, बुध – धनेश / लाभेश, तर चंद्र व्ययेश – सरकारी नोकरी आणि आíथक स्थितीसाठी बलवान. चंद्र, बुध, हर्षल, प्लुटो हे दशमेश / तृतीयेश शुक्राच्या नक्षत्रात – अधिकार, कर्तृत्वाला पूरक. पू.फा. – हे मंगळाच्या गुणधर्माचे नक्षत्र –

लग्नेश रवी व्ययात – लग्नेश / व्ययेश अन्योन्य योग. सरकारी नोकरीला पूरक.

रवी कर्क राशीत, मित्र राशीत, लाभेश / धनेश बुधाच्या आश्लेषा नक्षत्रात.

२. षष्ठात मकर राशीत गृह नाही. षष्ठावर मंगळ व गुरूची दृष्टी – गुरूची दृष्टी नोकरीत सातत्य, कामास पूरक, मंगळाची दृष्टी, कर्तृत्वाला पूरक.

षष्ठेश शनी त्याच्या धनात, कुंभ राशीत स्वत:च्या राशीत आहे शनी वक्री. शनी राहूच्या शततारका नक्षत्रात, राहू लाभात – नोकरी, त्यातून मिळणाऱ्या लाभास पूरक.

षष्ठेश / दशमाचा दशमेश शनीचा – भाग्येश मंगळ,  दशमेश / तृतीयेश शनीशी, राहूशी नवपंचम  योग – शुभ.

३. दशमेश स्थानात वृषभ राशीत गुरू. गुरू पंचमेश व अष्टमेश. पंचमेश दशमात शिक्षणाचा अर्थार्जनाशी संबंध, अष्टमेश दशमात अधिकार, सत्ता प्रस्थापित करण्यासाठी त्रास / प्रयत्न.  दशमातील गुरू लग्नेश रवीच्या कृत्तिका नक्षत्रात –  गुरू बलवान –

कृत्तिका नक्षत्र – बुधाच्या गुणधर्माचे.

दशमेश शुक्र लाभात, भाग्येश / चतुथ्रेश मंगळ व राहूबरोबर – महत्त्वाचा शुभ योग – कर्माचे लाभ हे दैवाने मिळणार, बरोबर राहू.  लाभ स्थानात राहू सर्वात बलवान होतो. दशमेश शुक्र आणि भाग्येश मंगळ राहूच्या आद्र्रा नक्षत्रात – बलवान, राहू – भाग्येश मंगळाच्या नक्षत्रात – बलवान,

आद्र्रा नक्षत्र – शनी गुणधर्माचे अधिकाराला पूरक.

४. शनी केंद्रात स्व-राशीत – श श योग – अधिकाराला पूरक.

५. नवमांशात लग्न वर्गोत्तम – सर्व भाव बलवान.

लग्नेश + भाग्येश एकत्र – केंद्रात – कुंभ नवमांशी (रवी + मंगळ)

दशमेश, शुक्र + पंचमेश गुरू एकत्र – शुभ – परंतु षष्ठात, मकर राशीत – नोकरी / व्यवसायात त्रास, कष्ट जास्त.

षष्ठेश शनी पंचमात धनू राशीत, सममित्र नवमांशी – बलवान.

६. करिअर काळात दशा :

मंगळ, राहू, गुरू

मंगळ : चतुथ्रेश / भाग्येश – लाभात

राहू : लाभ स्थानात – उच्चीचा गुरू : पंचमेश / अष्टमेश – परंतु दशमात –
विजय जकातदार – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Your career and your feature

ताज्या बातम्या