scorecardresearch

आपचे राज्यातील सर्व उमेदवार घोषित

आम आदमी पक्षाने येत्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या अकराव्या यादीत महाराष्ट्रातील दिंडोरी व नंदुरबार मतदारसंघांतील उमेदवारांची नावे आज जाहीर केली.

आम आदमी पक्षाने येत्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या अकराव्या यादीत महाराष्ट्रातील दिंडोरी व नंदुरबार मतदारसंघांतील उमेदवारांची नावे आज जाहीर केली. राज्यातील सर्व ४८ जागा लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिंडोरीत ज्ञानेश्वर दामू माळी तर नंदुरबारहून वीरेंद्र वळवी यांना उमेदवारी मिळाली आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघातून मेधा पाटकर, बारामतीतून सुरेश खोपडे, हातकणंगले रघुनाथदादा पाटील, चंद्रपूरमधून वामनराव चटप, नाशिकमधून विजय पांढरे, बीडमधून नंदू माधव, अहमदनगरमधून दीपाली सय्यद, धुळ्यातून निहाल अहमद, नागपुरातून अंजली दमानिया हे उल्लेखनीय उमेदवार आहेत.

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2014 at 01:04 IST

संबंधित बातम्या