अशोक चव्हाण
*राजकीय पक्ष: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष
*वय: ५५
*शिक्षण: एमबीए    
*संपत्ती: ३९ कोटी

*निवडणुकीसाठी मतदारसंघ कोणता आणि मतदारसंघाची पार्श्वभूमी: नांदेड. १९५२ नंतर ८ वेळा हा मतदार संघ काँग्रेसने राखण्यात यश मिळवले आहे. अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली आहे.

*प्रतिस्पर्धी कोण होते: दिगंबर (डी.बी.) पाटील (भाजप)

*उमेदवाराची राजकीय पार्श्वभूमी (आतापर्यंत कोणती पदे भूषविली, राजकीय प्रवास याबद्दल) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र. राज्य मंत्रीमंडळामध्ये सांस्कृतिक, उद्योग, खाण या खात्यांचेही मंत्री होते. महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्रीपदी.

*गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का?
नाही

*लक्षवेधक:  अशोक चव्हाण हे मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी एक आरोपीं आहेत.