मनसेच्या सहभागाबद्दल चर्चा नाही -राजू शेट्टी

महायुतीच्या समन्वय समितीच्या बठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहभागाबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही.

महायुतीच्या समन्वय समितीच्या बठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहभागाबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही. या पुढे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे नव्याने जागावाटप अशक्य असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हातकणंगले मतदार संघातील सांगली जिल्ह्यातील समाविष्ट गावांमध्ये मतदारांशी चर्चा करण्यासाठी खा. शेट्टी आज दुधगांव येथे आले होते. महायुतीत समन्वय रहावा यासाठी समन्वय समिती सामिल घटक पक्षांच्या नेत्यांची तयार करण्यात आली आहे.  निवडणुकीतील ध्येयधोरणासंदर्भात समन्वय समितीच्या बठकीत चर्चा करण्यात आली.  या चच्रेवेळी राज ठाकरे यांच्या मनसेच्या सहभागाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. तसा प्रस्तावही समन्वय समितीसमोर आलेला नव्हता.
नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांच्याशी केलेल्या चच्रेच्या पाश्र्वभूमीवर खा. शेट्टी म्हणाले की, महायुतीचे जागावाटप निश्चित करण्यात आले आहे.  मनसेला सहभागी करायचे म्हटले तर फेर जागावाटप करावे लागेल. हे अशक्य  आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: No discuss on mns participation raju shetty

ताज्या बातम्या