अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णलयात करोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यास इंडीयन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने ( आयसीएमआर) मान्यता दिली आहे. त्यामुळे रायगडकरांची करोना चाचणी प्रयोगशाळेची प्रतीक्षा आता संपली आहे.

रायगड जिल्‍हयात एप्रिल अखेरपासून करोना रूग्‍णांची संख्‍या झपाटयाने वाढण्‍यास सुरूवात झाली . त्यामुळे अलिबाग येथे करोना चाचणी प्रयोगशाळा सुरु करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. परंतु आयसीएमआरची मान्यता मिळाली नसल्यामुळे ही करोना चाचणी प्रयोगशाळा सुरू होऊ शकली नाही. त्‍यामुळे रायगडकरांना करोना चाचणीसाठी मुंबई किंवा नवीमुंबईतील प्रयोगशाळांवरच अवलंबून रहावे लागते आहे . आता आयसीएमआरने मान्यता दिल्यामुळे प्रयोशाळा सुरू करण्याची तांत्रिक अडचण दूर झाली आहे. आता लवकरच अलिबाग येथील शासकीय रुगणालायत करोना चाचणी प्रयोगशाळा सुरू होईल. अलिबाग येथील जिल्‍हा शासकीय रूग्‍णालयाच्‍या आवारात जुन्‍या रक्‍तपेढीच्‍या इमारतीत ही प्रयोगशाळा सुरू करण्‍यात येणार आहे.