करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना यासंदर्भात गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला लाइव्ह व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. आजही ते जनतेला संबोधित करत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केंद्रीय आरोग्य पथकासोबत बैठक घेऊन राज्याच्या कोरोनाबाबत प्रतिसादाचा आढावा घेतला होता. तसेच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी चर्चा केली होती. यावेळी एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते. या चर्चेचा आढावा आजच्या लाइव्हमध्ये मुख्यमंत्री ठाकरे घेतील, असं बोललं जातंय..

करोना व्हायरसमुळे वारीवरही यंदा विघ्न आलेय. नेहमी मोठ्या संख्येनं वारकरी वारीत सहभागी होतात. पण यंदा हा रम्य भक्तीसोहळा होणार नाही. त्याबद्दलही उद्धव ठाकरे बोलतील, असंही म्हटलं जातंय.