23 February 2019

News Flash

धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पुण्यात लाक्षणिक उपोषण

८ सप्टेंबर पर्यंत निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल.त्याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार राहील. असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

धनगर समाजाचा एस. टी. प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी पुण्यातील विधान भवनासमोर धनगर समाजातील नागरिक लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत. या सरकारने धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न सोडवल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल.असा इशारा देखील उपोषणकर्त्यांनी सरकारला दिला आहे.

यावेळी धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे म्हणाले की,भाजप ची राज्यात सत्ता येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला पहिल्या मंत्री मंडळात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असे लेखी आश्वसन दिले होते.त्या आश्वसनाला चार वर्षांचा काळ लोटला असून त्यामुळे धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे.या पार्श्वभूमीवर आज लाक्षणिक उपोषण करण्यात येत असून १३ आणि १४ ऑगस्ट रोजी राज्यातील जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.तर ८ सप्टेंबर पर्यंत निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल.त्याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार राहील. असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

First Published on August 10, 2018 2:26 pm

Web Title: dhangar community fasting protest in pune for reservation