28 January 2021

News Flash

राज्यात छटपूजेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर; घरीच राहून उत्सव साजरा करण्याचे आवाहन

मार्गदर्शक सूचनांना मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

उत्तर भारतीयांचा मोठा उत्सव असलेल्या छट पूजेबाबतही राज्य शासनाने इतर सणांप्रमाणेच काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. छटपूजेसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

याबाबत जनतेला आवाहन करताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, “छटपूजेसाठी आम्ही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, समुद्र किनाऱ्यांवर, नदी किनाऱ्यांवर आणि तालावांच्या काठी पूजा करता येणार नाही. आमचं जनतेला आवाहन आहे की त्यांनी या सूचनांच पालन करावं. करोनाचा संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी हे महत्वाचं आहे.”

राज्यात विशेषतः मुंबईत मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतातील स्थलांतरीत नागरिक वास्तव्याला आहेत. त्यामुळे मुंबईत समुद्र किनारी मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा केला जातो.  त्यानुसार नागरिकांना पुढील प्रमाणे सूचना करण्यात आल्या आहेत.

१) करोनामुळे समुद्रकिनारी गर्दी न करता घरीच राहून उत्सव साजरा करावा.
२) पूजेसाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात यावी.
३) कुठल्याही प्रकारच्या प्रदुषणात वाढ होऊ नये म्हणून फटाके, आतिषबाजी, ध्वनिक्षेपक यांना बंदी असेल.
४) मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे हे नियम कटाक्षाने पाळणे आवश्यक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 9:45 pm

Web Title: guidelines for chhatpuja released in the state an appeal to stay home and celebrate aau 85
Next Stories
1 मराठा आरक्षण : घटनापीठ स्थापनेसाठी सुप्रीम कोर्टात चौथ्यांदा विनंती अर्ज सादर
2 राज्यात करोनाच्या संसर्गात होतेय वाढ; दिवसभरात पाच हजार बाधितांची नोंद
3 भाजपाच्या काळात महावितरणची थकबाकी ५० हजार कोटींच्या जवळपास पोहचली – नितीन राऊत
Just Now!
X