राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाच्या  वेबसाईटवर दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Maharashtra SSC result 2018 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ मंडळांमार्फत मार्च २०१८ मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला सुमारे १८ लाख विद्यार्थी बसले होते.

How to see Maharashtra SSC 10th result 2018 online: निकाल कुठे बघता येणार?

परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील वेबसाईटवर उपलब्ध असतील:

http://www.mahresult.nic.in

http://www.sscresult.mkcl.org

http://www.maharashtraeducation.com

How to check Maharashtra SSC 10th result 2018 by SMS: एसएमएसद्वारे निकाल कसा बघता येणार?

नक्की वाचा : कसा पहाल दहावीचा निकाल?

दहावीचा निकाल बीएसएनएलच्या ग्राहकांना एसएमएसद्वारेही उपलब्ध असेल.

बीएसएनएलच्या ग्राहकांनी MHSSC टाईप करुन स्पेस द्यावा यानंतर आसनक्रमांक टाईप करावा आणि ५७७६६ या क्रमांकावर पाठवावा.

निकालाबाबतची अन्य माहिती पुढील प्रमाणे:

> ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येतील. यासाठी आवश्यक त्या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. संकेतस्थळावरील अर्जाची प्रत काढून अर्ज भरता येईल. विद्यार्थ्यांनी आवश्यकता असल्यास संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.

> मार्च २०१८ परीक्षेमधील उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुढील पाच कार्यालयीन कामाच्या दिवसांत पूनर्मूल्यांकनासाठी विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांना अर्ज करणे बंधनकारक आहे.