तालुक्यातील नागलवाडी येथे घराबाहेर झोपलेल्या १६ वर्षीय मुलीवर एकाने बलात्कार केल्याची घटना घडल्याने गावात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उकाडय़ामुळे नागलवाडी येथे वास्तव्यास असणारी मुलगी घराबाहेर अंगणात झोपली होती. रात्री दोनच्या सुमारास संशयित मुकेश ऊर्फ योगेश कांतीलाल राजपूत याने तिच्या तोंडात कापडी बोळा कोंबून बळजबरीने उचलून घरात नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. पीडित मुलीने याबाबत चोपडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित राजपूतला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th May 2015 रोजी प्रकाशित
चोपडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
तालुक्यातील नागलवाडी येथे घराबाहेर झोपलेल्या १६ वर्षीय मुलीवर एकाने बलात्कार केल्याची घटना घडल्याने गावात खळबळ उडाली आहे.
First published on: 17-05-2015 at 04:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor raped in chopda