News Flash

मराठा समाजाला अशा पद्धतीनं बदनाम करणं योग्य नाही -खा. छत्रपती संभाजीराजे भोसले

जबाबदार नेत्यांना हे वर्तन शोभणारे नाही

छत्रपती संभाजीराजे भोसले. (छायाचित्र सौजन्य : छत्रपती संभाजीराजे/फेसबुक)

राज्यात मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी संस्थेवरून बराच वाद आणि चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. संभाजीराजे यांनी आज एक ट्विट करून “मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये,” असं आवाहन सारथी संस्थेसंदर्भात सातत्यानं आवाज उठवत असलेले छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केलं आहे.

सारथीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणानंतर संस्था बंद करण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यातच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबवल्याचं वृत्तही समोर आलं होतं. मात्र, त्यामुळे मराठा क्रांती मोर्चांनं संस्थेचा कारभार असलेल्या विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्या मागणी केली. त्यावरून वडेट्टीवार यांनी आरोप केल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले ट्विट करून दोन समाजात वाद लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असं आवाहन केलं आहे.

“मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय देत एकत्र आणले. त्यांच्या नावाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेला आणि त्या आडून मराठा समाजाला अशा पद्धतीने बदनाम करणे योग्य होणार नाही. शिव-शाहू- फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांना हे वर्तन शोभणारे नाही,” असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे.

आणखी वाचा- सरकार पडणार?, मराठा आरक्षण व सारथी; तिन्ही प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

काय म्हणाले होते वडेट्टीवार?

“मी सारथीसाठी प्रामाणिकपणे काम करतोय. मी ओबीसी समाजातून आलेलो आहे म्हणून सतत मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे असं वाटत असल्याने, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सारथीची जबाबदारी मराठा मंत्र्याकडे देण्याची विनंती करणार आहे”, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 4:49 pm

Web Title: sarathi chhatrapati sambhaji raje bhosale reaction on wadettiwar statement bmh 90
Next Stories
1 रुग्णांची लूट थांबवा, ठाण्यातून २ ते ३ रुग्ण बेपत्ता; देवेंद्र फडणवीसांची सरकारला विनंती
2 राज्यात नोकरीसाठी डोमिसाइल बंधनकारक, भूमिपुत्रांसाठी ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय
3 औरंगाबाद जिल्ह्यात 150 करोनाबाधित वाढले, एकूण रुग्णसंख्या 6 हजार 680 वर
Just Now!
X