News Flash

व्हिडिओकॉन कंपनीच्या कामगारांच्या पाठिशी शिवसेना-अंबादास दानवे

कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही

संग्रहित छायाचित्र

व्हिडिओकॉन कंपनीतील कामगारांना सक्तीच्या रजेवर पाठवून ती कंपनी १५ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र या कंपनीच्या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. मात्र शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी शइवसेना या कामगारांच्या पाठिशी आहे असे म्हटले आहे. त्यामुळे या कंपनीच्या कामगारांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

शिवसेनेचे राज्यसभा खासदार राजकुमार धूत यांच्याच मालकीची ही कंपनी आहे. मात्र याच कंपनीतील कामगारांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यामुळे या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. मात्र अंबादास दानवे यांनी कामगरांच्या पाठिशी शिवसेना असणार आहे असे आश्वासन दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद शहरात शिव भरारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर अंबादास दानवेंना व्हिडिओकॉनच्या कामगारांबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी कामगारांच्या पाठिशी शिवसेना उभी असल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 7:11 pm

Web Title: shiv senas backing workers of videocon company says ambadas danve
Next Stories
1 भाजप सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात
2 जैतापूर, रिफायनरी प्रकल्प उभारणे चुकीचे – उद्धव ठाकरे
3 कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांची भांडीकुंडी रस्त्यावर आणणाऱ्यांची नियत खोटी-पवार
Just Now!
X