राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार राज्यातील ३ हजार २३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरवणार आहेत. परंतु अनेक जण असेही आहेत, ज्यांना मतदान करण्याची इच्छा नसते. ही मंडळी मतदानासाठी मिळणारी सुट्टी केवळ मजा मस्ती करण्यासाठी वापरतात. कारण मी मतदान नाही केलं तर काय फरक पडतो? असा विचार ही मंडळी करतात. परंतु चुकीचं आहे, कारण एका मतामुळेच कुठे सरकार कोसळलं होतं, कुणाच्या तोंडापर्यंत आलेला विजय हिरावून घेतला गेला होता. एका मताचं महत्त्व सांगणाऱ्या घटनांचा घेतलेला आढावा.

सरकार कोसळले – अटल बिहारी वाजपेयी यांचे १३ महिन्यांचे सरकार १९९९ साली केवळ एका मताने कोसळले होते. त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आला होता. त्यावेळी झालेल्या मतदानात २७० सदस्यांनी वाजपेयींच्या विरोधात मतदान केले होते. तर २६९ जणांनी त्यांच्या बाजूने मतदान केले होते.

in Yavatmal-Washim Constituency Uddhav Thackerays candidates will lose Due to the election symbol
‘धनुष्यबाण’ उद्धव ठाकरेंच्या उमेदवारासाठी ठरणार नुकसानदायी; यवतमाळ-वाशीम मतदारसंघात…
Why did Sunetra Pawar say The relationship will improve after the election
सुनेत्रा पवार का म्हणाल्या… निवडणुकीनंतर नात्यात सुधारणा होईल
Fairness in elections
निवडणुकीतला निष्पक्षपातीपणा टिकू शकतो, तो कसा? कुणामुळे?
Kachathivu Island
लेख: निवडणूक प्रचारात कचाथीवूचा शंखनाद!

चिठ्ठी उडवून जिंकले – २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत भाजपाचे अतुल शाह आणि शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर एकमेकांविरोधात लढत होते. या लढतीत दोन्ही उमेदवारांना २२६ मते मिळाली होती. दोघांनाही समान मते मिळाल्यामुळे एका मतासाठी चिठ्ठी उडवण्यात आली. या चिठ्ठीचा निकाल अतुल शाह यांच्या बाजूने लागला. परिणामी केवळ एका मताने सुरेंद्र बागलकर यांना हार पत्करावी लागली होती.

एका मताने पराभव – २००४ साली कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ए. आर कृष्णमूर्ती यांना ४० हजार ७५१ मते मिळाली होती. त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला ४० हजार ७५२ मते मिळाली होती. कृष्णमूर्ती यांचा केवळ एका मताने परावभ झाला होता. एका मताने निवडणूक हरणारे ते देशातील पहिले उमेदवार होते.

मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले – २००९ साली विधानसभा निवडणुकीत सी.पी. जोशी यांना ६२ हजार २१५ मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या कल्याण सिंह चौहान यांना ६२ हजार २१६ मते मिळाली होती. अशा प्रकारे जोशी केवळ एका मताने पराभूत झाले होते. या पराभवामुळे त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न देखील भंगले.

पंतप्रधानपदाचा दावेदार – १९७९ साली मार्गारेट थेचर ब्रिटनच्या विरोधी पक्ष नेत्या होत्या. तेव्हाचे पंतप्रधान जेम्स कॅलहेन विरोधात त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावाच्या बाजूने ३११ मते पडली तर विरोधात ३१० मते पडली. या एका प्रस्तावामुळे कॅलहेन सरकार पडले होते.

अमेरिकेचे राष्ट्रपती – १८७६ साली रुदरफोर्ड हेस अमेरिकेचे राष्ट्रपती झाले. त्यावेळी त्यांच्या विरोधात सॅम्युअल टिल्डेन उभे होते. मतांची मोजणी झाली तेव्हा रुदरफोर्ड यांना १८५ मते मिळाली तर टिल्डेन यांना १८४ मते मिळाली होती. अवघ्या एका मतामुळे रुदरफोर्ड अमेरिकेचे राष्ट्रपती झाले.