गेल्या ६० वर्षातील सिंचनाचा पैसा कुठे गेला? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात केला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित होते. राज ठाकरेंनी आपल्या भाषणांमध्ये सर्वच पक्षांवर कडाडून टिका केली होती. त्यानंतर आलेल्य अजित पवार यांनी न न घेता बोलघेवडे संबोधत राज ठाकरे यांना टोला लगावला. काही जण बोलघेवडे असतात.ते काहीच करत नाही.  त्यांना फक्त सभा जिंकयाच्या असतात.असा टोला अजित पवार यांनी लगावला.

अजित पवार यांनी आमिर खान यांच्या कामाची स्तुती केली. त्याचवेळी आमिरला राजकारणात न येण्याचा सल्लाही दिला. आमिर खान पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून चांगले करीत आहे. त्यामुळे तुम्हाला नागरिक डोक्यावर घेत आहे. पण आमिर यांनी भविष्यात कधी ही राजकीय व्यासपीठावर जाऊ नये. असा सल्ला अजित पवार यांनी अमीर खान यांना दिला. कारण आमच्या प्रत्येक व्यक्तीवर राजकीय पक्षांचा एक शिक्का असल्याचे त्यांनी सांगितले.

पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आदी उपस्तिथ होते.

राज ठाकरे काय म्हणाले – 

1960 साली महाराष्ट्र संयुक्त झाला. तेव्हापासून आतापर्यंत पाटबंधारे खात्याचा पैसा कुठं गेला. आतापर्यंत हे पाणी पाटबंधारे खात्यात जे पाणी मुरलं ते अडवलं असते. तर राज्यातील पाण्याची पातळी वाढली असती. असा टोला राज ठाकरे यांनी अजित पवारांना त्यांनी लगावला.  जे सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडतात तेच मलाही पडतात. काहीवेगळे प्रश्न पडत नाहीत. पाटबंधाऱ्यात पैसा मुरला नसता तर आज गावे पाणीदार झाली असती, अशी बोचरी टीका यावेळी राज ठाकरे यांनी केली.

 

वॉटर कप स्पर्धा 2018 ची विजेते गावे आहेत –

प्रथम क्रमांक – टाकेवाडी (आंधळी) ता. माण, जी सातारा 75 लाख आणि ट्रॉफी

द्वितीय क्रमांक – भांडवली, (ता.माण, जी. सातारा) आणि सिंदखेड (ता. मोताळा जी. बुलढाणा) प्रत्येकी 25 लाख आणि ट्रॉफी

तृतीय क्रमांक – आनंदवाडी (ता.आष्टी) आणि उमठा (ता. नरखेड, नागपूर) प्रत्येकी 10 लाख आणि ट्रॉफी